पनवेल दि.१७: देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती या काळात भारतीय जनता पक्षाच्यावतीने विविध सेवाकार्य असलेल्या ‘सेवा पंधरवडा’चे आयोजन करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कामोठे युवा मोर्चाच्यावतीने आज कामोठे येथील भाजप व आमदार प्रशांत ठाकूर जनसंपर्क कार्यालयात रक्तदान शिबिर पार पडले. या शिबिरास प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष कृपाशंकर सिंह यांची उपस्थिती लाभली.
यावेळी भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, प्रदेश भाजपचे चौबे, कामोठे शहर मंडल अध्यक्ष रवी जोशी, माजी नगरसेवक डॉ. अरुणकुमार भगत, विजय चिपळेकर, विकास घरत, गोपीनाथ भगत, भाऊ भगत, रवींद्र गोवारी, प्रदीप भगत, माजी नगरसेविका हेमलता गोवारी, कुसूम म्हात्रे, महिला मोर्चाच्या कामोठे अध्यक्षा वनिता पाटील, भटके विमुक्त आघाडीच्या जिल्हाध्यक्षा विद्या तामखडे, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, कामोठे युवा मोर्चाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष राजेश गायकर, उत्तर भारतीय सेलचे जिल्हा संयोजक जितेंद्र तिवारी, रुपाली सिन्हा, यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते यांची प्रमुख उपस्थिती होती.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!