पनवेल दि.१४ (संजय कदम) महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसुत्र खेचुन पसार होणाऱ्या त्रिकुटापैकी दोघांना अजमेर राजस्थान येथुन पनवेल शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे .
आरोपी मोहम्मद इर्शाद मोहम्मद नौशाद सिध्दीकी वय-२२ वर्षे, धंदा-रिक्षा चालक रा.गोवंडी व त्याचा सहकारी अफरोज फिरोज शेख वय-१८ रा. गोवंडी तसेच आवेश अशी अटक करण्यात आलेल्या चोरट्यांची नावे आहेत.
ज्योती जानकर, (वय ६०) या पनवेल हददीतील वडाळे तलाव स्मशानभूमी येथून घरी जात असताना चोरटयांनी रिक्षा मधुन येवून त्यांच्या गळ्यातील दोन सोन्याचे मंगळसुत्र खेचुन चोरी करून पळुन गेले होते. या बाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात होताच वपोनि नितीन ठाकरे यांचे मागर्दशनाखाली, पोलीस उप निरीक्षक हजरत पठाण, पोहवा मिथुन भोसले, पोना प्रविण मेथे, पोशि साईनाथ मोकळ, पोशि किरण कराड आदींच्या तपास पथकाने तांत्रिक तपास व सी.सी.टी.व्ही. फुटेजच्या आधारे पहिले असता चोरटे रिक्षा मधुन येवून त्यांचे सोन्याचे मंगळसुत्र खेचुन पसार झाले होते. अधिक तपासात यातील दोघेजण हे अजमेर राजस्थान येथे लपून बसल्याचे समजताच त्यांना त्या ठिकाणाहून अटक केली. तिसरा चोरटा आवेश याचा शोध सुरु असून, अधिक तपास पोलीस उप निरीक्षक हजरत पठाण करीत आहेत.
![]()
