पनवेल, दि.27: विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी 15 ऑक्टोबर 2024 पासून आदर्श आचारर्संहिता लागू झाली आहे. पनवेल 188 विधानसभा मतदार संघ,  निवडणूक विभाग अंतर्गत आचार संहिता पथकांतर्गत स्थिर सर्वेक्षण पथक क्रमांक 6 (एसएसटी पथक ) ने पनवेल जवळील शेडुंग टोल नाका येथे वाहन तपासण्याचे कर्तव्य करत असताना रात्रौ 23:55 वाजण्याचे जुन्या मुंबई-पुणे हायवे रोडवरुन जाणार्‍या हुंडाई ऑरा पांढर्‍या रंगाची चार चाकी गाडी थांबवून तपासणी केली असता त्या गाडीमध्ये 4 लाख 31 हजाराची रोख रक्कम आढळून आली. सदरील रक्कम संशयास्पद असल्याने ही रक्कम पथकामार्फत जप्त करण्यात आली.
सदर कारवाई 188 पनवेल विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी पवन चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईवेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विजय पाटील, आचारसंहिता पथक प्रमुख भारत राठोड, सहाय्यक खर्च निरीक्षक विजय फासे, सहाय्यक खर्च निरीक्षक संजय आपटे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी संजय भालेराव, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी संदिप कराड, आचार संहिता पथक प्रमुख महेश पांढरे, आचार संहिता सनियंत्रण अधिकारी शरद गीते, सहाय्यक आचार संहिता पथक प्रमुख जी.एस.बहिरम, सहाय्यक आचार संहिता पथक समन्वयक  दिनेश भोसले, नितेश चिमणे, तुषार म्हात्रे, नितेश चिमणे, आशा डोळस, शेडुंग टोल पोस्ट एसएसटी पथकाचे प्रमुख कैलास चव्हाण, तळोजा पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक श्रीराम सैदाणे व पनवेल शहर पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई अक्षय वाधमोर आदी पथक उपस्थित होते.

Loading

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!