रायगड दि.0५: रायगड जिल्ह्यातील महसूल हद्दीमध्ये शासनाच्या सर्व खात्यांमधील कार्यालयांकरिता 3 स्थानिक सुट्टया जाहीर करण्याचे अधिकारी जिल्हाधिकारी यांना प्रदान करण्यात आले आहेत.
त्यानुसार सन-2025 या वर्षाकरिता गुरुवार, दि.13 मार्च 2025 रोजी होळी, मंगळवार, दि.2 सप्टेंबर 2025 ज्येष्ठा गौरी विसर्जन, सोमवार, दि.20 ऑक्टोबर 2025 रोजी नरक चतुर्थी या तीन स्थानिक सुट्टयांची अधिसूचना जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी जारी केली आहे.