पनवेल दि.४: भारतीय दृष्टिबाधित क्रिकेट संघाने इंडसइंड बँक यांच्या सहयोगातून आगामी महिला टी-२० विश्वचषक दृष्टिबाधित क्रिकेट २०२५ साठी टीम इंडियाच्या अधिकृत जर्सीचे अनावरण केले. हा ऐतिहासिक विश्वचषक ११ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे.
या अनावरण सोहळ्यास सीएबीआयचे अध्यक्ष व समर्थन ट्रस्टचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय विश्वस्त डॉ. महंतेश जी. किवादासन्नवर, सीएबीआयचे अधिकारी, टीमच्या कर्णधार आणि उपकर्णधार, इंडसइंड बँकेच्या कार्यकारी उपाध्यक्ष आणि कॉर्पोरेट सामाजिक उत्तरदायित्व प्रमुख मटिल्डा लोबो, स्पर्धेच्या अध्यक्षा मीनाक्षी लेखी, भारतातील श्रीलंकेच्या उच्चायुक्त महामहीम महिषिनी कोलोन तसेच टीम इंडियाचे समर्थक उपस्थित होते.
इंडसइंड बँक गेल्या दशकभरापासून दृष्टिबाधित क्रिकेटची अभिमानास्पद भागीदार आहे. बँकेच्या कॉर्पोरेट सामाजिक उत्तरदायित्व उपक्रमांद्वारे (CSR) खेळांच्या माध्यमातून समावेशकता आणि सक्षमीकरणाला चालना देण्याचे कार्य सातत्याने केले जात आहे.जर्सीचे अनावरण हा भारतीय दृष्टिबाधित महिला क्रिकेटसाठी अभिमानाचा क्षण ठरला आहे. कारण भारतीय महिला संघ आता जगातील पहिल्या दृष्टिबाधित महिला टी-२० विश्वचषकात भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. भारत आणि श्रीलंका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित हा स्पर्धा ११ ते २३ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत नवी दिल्ली, बेंगळुरू आणि कोलंबो येथे पार पडणार असून ऑस्ट्रेलिया, भारत, नेपाळ, पाकिस्तान, श्रीलंका आणि अमेरिका हे सात देश यात सहभागी होणार आहेत.

Loading

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!