ठाणे दि.२६: मराठी विज्ञान परिषद ठाणे विभाग नगरसेवक राजेशजी मोरे यांच्या सहकार्याने विज्ञान दिनाच्या दिवशी कचराळी तलाव उद्यान येथे विज्ञान कट्टा सुरू करीत आहे. या विज्ञान कट्ट्याचा पहिला कार्यक्रम शनिवार 28 फेब्रुवारी रोजी सायं. 6 वाजता कचराळी तलाव उद्यान, पाचपाखाडी, ठाणे येथे होणार आहे. ‘कृत्रिम बुद्धिमत्ता- एक वरदान’ या विषयावर डाॅ. प्रशांत कानडे आणि दा.कृ.सोमण श्रोत्यांशी संवाद साधणार आहेत. यावेळी श्रोत्यांना मोठ्या दुर्बिणीतून गुरू ग्रहाचे चंद्रही दाखविण्यात येणार आहेत.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश बोर्डे करणार आहेत. हा कार्यक्रम सर्वांसाठी मोफत आहे. समाजात विज्ञान विषयाची आवड निर्माण व्हावी, अंधश्रद्धा-गैरसमज दूर व्हावेत या उद्देशाने हा विज्ञान कट्टा सुरू होत आहे. दर महिन्यात एक विज्ञान विषयक कार्यक्रम मराठी विज्ञान परिषद ठाणे विभागातर्फे सादर केला जाणार आहे.
![]()
