ठाणे दि.२४: यावर्षी सोमवार 2 मार्च रोजी होलिका दहन करायचे असून धूलिवंदन सण मंगळवार 3 मार्च रोजी असल्याचे पंचांगकर्ते, खगोल अभ्यासक दा.कृ.सोमण यांनी सांगितले. या विषयी शास्त्राधार सांगताना दा.कृ.सोमण म्हणाले की यावर्षी सोमवार 2 मार्च रोजी सायं. 5 वाजून 55 मिनिटांनी फाल्गुन पौर्णिमा सुरू होते. त्या दिवशी प्रदोष काळात पौर्णिमा आहे. तसेच मंगळवार 3 मार्च रोजी ग्रस्तोदित चंद्रग्रहण आहे. त्यामुळे धर्मसिंधूत सांगितल्याप्रमाणे पूर्वदिवशी म्हणजे सोमवार 2 मार्च रोजी होलिका दहन करावे. सोमवारी 2 मार्च रोजी सूर्यास्तानंतर प्रदोष काळात भद्राकालातही होलिका दहन करता येते हेही दा.कृ.सोमण यांनी स्पष्ट केले.

Loading

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!