पनवेल दि.23: पनवेल जवळील पांडवकड्याच्या धबधब्याच्या डोहात बुडून एका 18 वर्षीय तरूणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
पांडवकडा येथे मानखुर्द गोवंडी येथील शालेय मित्र गौरव लोखंडे, अखीप खान, सुरज यादव, मौसम घर्ती, राहील खान असे आले होते. त्यात गौरव लोखंडे व राहिल खान तसेच मौसम घरती यांनी डोहामध्ये उड्या मारल्या त्यात गौरव व राहील असे वर येऊन मौसम घर्ती हा वर आला नाही तेव्हा त्यांनी नवी मुंबई कंट्रोलला कळविले. फायर ब्रिगेड व खारघर पोलिस यांनी पाण्यात गळ टाकून तसेच प्रत्यक्ष स्वीमरपाठवून त्याचा शोध घेतला परंतु रात्री मृतदेह मिळून आला नाही. आज सकाळी 9:30 वाजेच्या सुमारास फायर ब्रिगेड कर्मचाऱ्यांनी तेथील डोहातील खडका खाली अडकलेले प्रेत बाहेर काढले. मृत तरुण मौसम रामबहादुर घर्ती वय वर्षे 18 गोवंडी पश्चिम, मुंबई येथे राहणार आहे.
लोक कुठुनही खारघर डोंगरातून पायवाटेने डोगंरातील धबधब्यात जातात व जीवनास मुकतात तरी अश्या धोकादायक ठिकाणी मौजमजा करण्यास जाऊ नये असे आवाहन वरीष्ठ पोलीस निरीक्षक शत्रुघ्न माळी यांनी जनतेस केले आहे.