पनवेल, दि. ७: जागतीक महिला दिनाचे औचित्य साधून महिलांसाठी कोविड १९ च्या लसीकरणाच्या विशेष सत्राचे आयोजन पनवेल महापालिकेतर्फे करण्यात आले आहे. नागरी आरोग्य केंद्र १ येथे आयोजित या सत्राचा महिलांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आयुक्त सुधाकर देशमुख यांनी केले आहे.
जागतीक महिला दिनानिमित्त कोवीड १९ च्या नियमांचे पालन करीत पालिकेतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. त्याचबरोबर महिलांसाठी लसीकरणाच्या विशेष सत्राचे आयोजन केले आहे. पनवेल येथील गावदेवी मंदिराशेजारी नागरी आरोग्य केंद्र एक येथे या सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. याबरोबरच आधी सुरू असलेल्या केंद्रावर नियमीत लसीकरण सुरू राहील.