MSBSHSE बारावीचा निकाल आज शरद गोसावी यांनी जाहीर केला आहे. या लेखी परीक्षेमध्ये 12 लाख 92 हजार 468 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून बारावीच्या निकालाची आज घोषणा झाली आहे. या परीक्षेचा राज्याचा निकाल 91.25 % लागला आहे. सर्वाधिक निकाल कोकण विभागाचा लागला आहे. कोकण विभागाचा निकाल 96.01 % लागला आहे. यंदा देखील बोर्डाच्या परीक्षेत मुलींनी बाजी मारलेली पहायला मिळाली आहे. सर्वात कमी निकाल मुंबई विभागीय मंडळाचा लागला आहे.
12वीचा ऑनलाईन निकाल आज कुठे पाहू शकाल?
mahresult.nic.in
hscresult.mkcl.org
hsc.mahresults.org.in
12वीचा निकाल कसा पहाल?
mahresult.nic.in ही किंवा वर दिल्यापैकी बोर्डाची कोणतीही अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
-अधिकृत वेबसाईटच्या होमपेजवर Latest Announcement Of the HSC Results चा पर्याय दिसेल.
त्यानंतर HSC Examination Result वर क्लिक करा
-आता तुम्हांला एका नव्या विंडोवर रिडीरेकट केलं जाईल, तिथे तुम्हांला रोल नंबर (Roll Number) आणि आईचं नाव (Mother’s Name) टाईप करा.
-त्यापुढे View Result वर क्लिक करा
-तुम्ही उत्तीर्ण असाल तर तुम्हांला तुमचा निकाल पाहता येईल
-तुमच्या निकालाची प्रिंट आऊट काढण्याची, सेव्ह करण्याची सोय आहे.