ज्येष्ठ पौर्णिमा हा दिवस ‘वटपौर्णिमा’ म्हणून साजरा केला जातो. सौभाग्याच प्रतिक आणि सौभाग्यवतीचे फणी करंडा, काळी पोत, हिरव्या बांगड्या हे सौभाग्य अलंकार तिथे अर्पण करतात वडाला पाच प्रदिक्षणा मारून सूत गुंडाळतात. मनोभावे वटवृक्ष राजाचे पूजन करतात. हे व्रत सुवासिनी अपल्या पतिला उत्तम आरोग्य लाभावे, दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून करतात.
त्यात महिला पोलिसांची वटपौर्णिमा जरा आगळीवेगळीच असते.
खारघर पोलीस स्टेशनच्या महिला अधिकारी व अंमलदार यांनी नोकरीचं आणि घराचं कर्तव्य पार पाडत आज वटपोर्णिमे निमित्त खाकी वर्दीमध्ये
वडाला पाच प्रदिक्षणा मारून सूत गुंडाळतात आपले व्रत पूर्ण केले.