पनवेल दि.२८ : पनवेल महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता १५ एप्रिल पर्यंत हे आदेश लागू असून नागरिकांनी या आदेशाचे पालन करणे अनिवार्य असणार आहे.
२८ मार्च पासून रात्री ८.०० ते सकाळी ७.०० या वेळेत पाच व्यक्तीपेक्षा जास्त व्यक्तीस एकत्रित येण्यास मनाई असेल.
महानगरपालिका क्षेत्रातील सर्व सार्वजनिक उद्याने केवळ सकाळी ७.०० ते ११.३० या वेळेमध्ये खुली राहतील. या सुचनाचे उल्लंघन केल्यास १००० रूपये इतका दंड आकारण्यात राण्यात येईल.
सर्व सार्वजनिक ठिकाणे रात्री८.०० ते सकाळी ७.०० पर्यंत बंद राहतील. या सुचनांचे उल्लंघन केल्यास १००० रूपये इतका दंड आकारण्यात येईल.
मास्कचा वापर न करणाऱ्या व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल. तसेच सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या व्यक्तीकडून १००० रूपये इतका दंड आकारण्यात येईल.
पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील सर्व चित्रपटगृहे, मॉल्स, नाट्यगृहे, उपहारगृहे, बार, खानावळ, भोजनालय, आणि फूडस्टॉल इत्यादि २८ मार्च पासून रात्री ८.०० ते सकाळी ७.०० वाजेपर्यंत बंद राहतील. या कालावधीमध्ये रेस्टॉरंट मधून होम डिलिव्हरी आणि टेकअवे सुविधा सुरू राहतील. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यास केंद्र शासनाकडून कोव्हीड१९ महामारी संपल्याचे जाहीर होत नाही तोपर्यंत संबधित चित्रपट गृहे, मॉल, नाट्यगृह, उपहार गृह, बारृ खानावळृ भोजनालय आणि फूडस्टॉल हे पुर्णत: बंद करण्यात येईल.
तसेच महानगरपालिका शासकिय कार्यालयांमध्ये लोकप्रतिनिधी व्यतिरिक्त इतरांस अत्यावश्यक कामाशिवाय प्रवेश दिला जाणार नाही . ज्यांना कार्यालयामार्फत बैठकीकरिता बोलविले आहे अशा अभ्यागतांकरिता संबधित कार्यालये तसेच कार्यालय प्रमुख यांच्यावतीने विशेष पासची सुविधा उपलब्ध करून दण्यात यावी.
या लॉकडाऊन नियमांचे उल्लंघन करणारी कोणतीही व्यक्ती किेंवा संस्था यांच्यावर साथरोग अधिनियम १८९७, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ कलम ५१ ते ६० अन्वये तसेच, भारतीय दंड संहिता यामधील कलम १८८ अन्वये कारवाई केली जाईल असे आदेश पालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांनी दिले आहेत.