मुंबई, दि.१८ : राज्यात उद्यापासून (दि.१९ जून) ३० ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणास सुरुवात होणार आहे. शासकीय लसीकरण केंद्राच्या माध्यमातून ही मोहीम राबविण्यात येणार आहे. ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण नियमितपणे सुरू राहणार असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

१८ ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाबाबत प्राधान्यक्रम ठरविण्याची मुभा केंद्र शासनाने राज्यांना दिली आहे. त्यानुसार राज्याच्या आरोग्य विभागाने लसीकरणाच्या सुनियोजनासाठी वयोगटाचा टप्पा निश्चित केला असून त्याप्रमाणे शनिवार १९ जून पासून ३० ते ४४ या वयोगटातील नागरिकांना लस दिली जाणार आहे.

शासकीय लसीकरण केंद्रावरील लसीकरणासाठी पूर्वनोंदणी ही ऑनलाईन आणि प्रत्यक्ष केंद्रावर जाऊन देखील करता येणार आहे. ३० ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरण सत्रांचे नियोजन करण्याकरिता कोविन ॲप मध्ये आवश्यक ते बदल करण्यात येणार आहेत. विभागाच्या अतिरिक्त संचालक डॉ.अर्चना पाटील यांनी राज्यातील सर्व आरोग्य उपसंचालक, जिल्हा शल्यचिकिस्तक, जिल्हा आरोग्यधिकारी यांना त्याबाबत पत्र पाठविले असून संबंधित कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत.

राज्य शासनाच्या आज रोजीच्या व्हिडिओ काँफेरेन्सद्वारे देण्यात आलेल्या सुचनांप्रमाणे दि.१९/०६/२०२१ पासुन पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील सर्व शासकीय लसीकरण केंद्रावर दुपारी २.३० ते ५.०० या वेळेत वय वर्षे ३० ते ४४ वयोगटातील १०० नागरीकांना Covishield लसीची लसीकरण सेवा सुरू करण्यात येणार आहे. कुपन वाटप (१०० नागरिकांसाठी) सकाळी ११.०० वाजेपासुन केले जाईल.
         वय वर्षे ४५ वर्षावरील १०० नागरिकांचे लसीकरण सकाळी १०.०० ते १.३० वाजेपर्यंत याच केंद्रावर पूर्वीसारखेच होणार आहे.
        यापूर्वी चालु असलेले Covaxin च्या दुसऱ्या डोसचे लसीकरण नमूद २ केंद्रावर पूर्वीप्रमाणेच चालू राहील.
असे पनवेल महानगरपालिका वैद्यकीय आरोग्य अधिकारी
डॉ.आनंद गोसावी यांनी सांगितले.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!