23 भिवंडी लोकसभा मतदारसंघात सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत अंदाजे 48.89 टक्के मतदान
लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदानाला ठाणे जिल्ह्यातील 23 भिवंडी लोकसभा मतदारसंघात आज दि. 20 मे 2024 रोजी सकाळी 7.00 वाजल्यापासून सुरुवात झाली. 23 भिवंडी मतदारसंघातील एकूण 6 विधानसभा मतदारसंघात सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत अंदाजे सरासरी 48.89 टक्के मतदान झाले आहे.
ठाणे जिल्ह्यातील 23 भिवंडी मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे-
134 भिवंडी ग्रामीण – 58.00 टक्के
135 शहापूर – 50.99 टक्के
136 भिवंडी पश्चिम – 47.80 टक्के
137 भिवंडी पूर्व – 43.37 टक्के
138 कल्याण पश्चिम –43.00 टक्के
139 मुरबाड – 51.18 टक्के
ही आकडेवारी अंदाजे असून अंतिम आकडेवारी मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मिळणार आहे.

24 कल्याण लोकसभा मतदारसंघात सायंकाळी 5.00 अंदाजे 41.70 टक्के मतदान
लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदानाला ठाणे जिल्ह्यातील 24 कल्याण लोकसभा मतदारसंघात आज दि. 20 मे 2024 रोजी सकाळी 7.00वा.पासून सुरुवात झाली. 24 कल्याण मतदारसंघातील एकूण 6 विधानसभा मतदारसंघात सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत अंदाजे सरासरी 41.70 टक्के मतदान झाले आहे.
ठाणे जिल्ह्यातील 24 कल्याण मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे-
140 अंबरनाथ – 40.01 टक्के
141 उल्हासनगर – 42.68 टक्के
142 कल्याण पूर्व – 42.58 टक्के
143 डोंबिवली – 42.51 टक्के
144 कल्याण ग्रामीण – 42.73 टक्के
149 मुंब्रा कळवा – 40.35 टक्के
ही आकडेवारी अंदाजे असून अंतिम आकडेवारी मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मिळणार आहे.

25 ठाणे लोकसभा मतदारसंघात सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत अंदाजे 45.38 टक्के मतदान
लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदानाला ठाणे जिल्ह्यातील 25 ठाणे लोकसभा मतदारसंघात आज दि. 20 मे 2024 रोजी सकाळी 7.00 वाजल्यापासून सुरुवात झाली. 25 ठाणे मतदारसंघातील एकूण 6 विधानसभा मतदारसंघात सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत सरासरी अंदाजे 45.38 टक्के मतदान झाले आहे.
ठाणे जिल्ह्यातील 25 ठाणे मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघनिहाय अंदाजे टक्केवारी पुढीलप्रमाणे—
145 मिरा भाईंदर – 43.25 टक्के
146 ओवळा माजिवडा – 44.29टक्के
147 कोपरी पाचपाखडी – 51.07 टक्के
148 ठाणे – 45.99 टक्के
150 ऐरोली –42.66 टक्के
151 बेलापूर – 47.12 टक्के
ही आकडेवारी अंदाजे असून अंतिम आकडेवारी मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मिळणार आहे.

Loading

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!