पनवेल दि. ०५ (वार्ताहर) : पनवेल चे माजी नगराध्यक्ष व सीनियर क्रिकेट टीम पनवेल चे सर्वेसर्वा सईद मुल्ला याच्या 79 व्या वाढदिवसानिमित्त जागतिक पर्यावरणाच्या निमित्त साधून वृक्षारोपणाचा कार्यक्रम पनवेल तालुका क्रीडा केंद्र येथे वृक्षारोपण करून साजरा करण्यात आला.
झाडे लावल्याने निसर्गाचा समतोल साधला जाईल व ग्लोबल वॉर्मिंग वर मात करता येईल. झाडे लावा झाडे जगवा सामाजिक संदेश सईद मुल्ला आपल्या मित्रा मंडळींच्या सहवासात दिला.

या छोटेखानी कार्यक्रमात सईद मुल्ला यांचा वाढदिवस केक कापून करण्यात आला. यावेळी सिनियर क्रिकेट टीमचे कर्णधार भाई सुभाष पाटील व उप कर्णधार प्रमोद पाटील, खजिनदार राजेंद्र पाटील, डॉक्टर ययाती गांधी, डॉक्टर नितीन पोवळे, डॉक्टर रवींद्र राऊत, डॉक्टर सचिन शेठ, सागर आठवणे, अप्पू कुंभार, विकास सलाग्रे, त्रिशुल म्हात्रे, विजय पाटील, सुहास देशमुख, गोपाळ भोईर, अशोक भगत, सचिन डागरे, संदीप पाटील, भावेश बिराजदार, महेश पाटकर, जयवंत भोईर, जमदाडे, हेमंत आंबेतकर आदी उपस्थित होते.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!