पनवेल दि.11: पनवेल ग्रामीण मध्ये आज आढळलेल्या रूग्णांमध्ये करजांडे येथील ६, उलवे नोडमधील ६, पालीदेवद (सुकापुर) येथे २ तर उसर्ली खुर्द येथील एका रूग्णाचा समावेश आहे. 
पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील आजचे २४ रूग्ण
कामोठे: ६
कामोठे, सेक्टर-३५, संकल्प सोसायटी येथील एकाच कुटुंबातील ४५ वर्षीय व ११ वर्षीय अशा २ महिला कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेल्या आहेत. सदरपैकी एक महिला मुंबई महानगरपालिका येथे लिपिक म्हणून कार्यरत आहे. त्या महिलेला कामाच्या ठिकाणीच संसर्ग झाला असून तिच्या मुलीला तिच्यापासूनच संसर्ग झाल्याचा अंतिम निष्कर्ष आहे.

कामोठे, सेक्टर-११, आशियाना कॉम्प्लेक्स येथील एकाच कुटुंबातील २७ वर्षीय व २५ वर्षीय अशा २ व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेल्या आहेत. सदर कुटुंबाचा कुटुंब प्रमुख याआधी कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेला होता. त्यांच्यापासूनच या दोघांना संसर्ग झाल्याचा अंतिम निष्कर्ष आहे.

कामोठे, सेक्टर-५, मारूती टॉवर येथील १ व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेली आहे. ही व्यक्ती नागपाडा पोलिस स्टेशन, मुंबई येथे पोलिस कॉन्सटेबल म्हणून कार्यरत आहे. कामाच्या ठिकाणीच त्यांना संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे.

कामोठे, सेक्टर-१७, रिध्दी सिध्दी दर्शन येथील ३६ वर्षीय १ व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेली आहे. सदर व्यक्ती शिवाजी नगर पोलिस ठाणे, गोवंडी येथे पोलिस दलात कार्यरत आहे. कामाच्या ठिकाणीच त्यांना संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे.

खांदाकॉलनी: ८
खांदाकॉलनी, सेक्टर-७, श्रीजी संघ सोसायटी येथील एकाच कुटुंबातील ४ व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेल्या आहेत. सदर कुटुंबातील कुटुंब प्रमुख याआधीच कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेली होती. त्यांच्यापासूनच या चौघांना संसर्ग झाल्याचा अंतिम निष्कर्ष आहे.

खांदा कॉलनी, सेक्टर-७, सागरदीप सोसायटी येथील एकाच कुटुंबातील ४ व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेल्या आहेत. सदर व्यक्तींचे नातेवाईक खांदा कॉलनी, सेक्टर-७, श्रीजी संघ सोसायटी येथे राहत असून ते याआधीच कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेले आहेत. त्यांच्यापासूनच या चौघांना संसर्ग झाल्याचा अंतिम निष्कर्ष आहे.

कळंबोली: ३
कळंबोली, सेक्टर-३ई, KL-५ येथील एकाच कुटुंबातील २ व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेल्या आहेत. सदर कुटुंबातील कुटुंब प्रमुख मुंबई येथे बेस्ट कंडक्टर असून ते याआधीच कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेले आहेत. त्यांच्यापासूनच या दोघांना संसर्ग झाल्याचा अंतिम निष्कर्ष आहे.

कळंबोली, सेक्टर-३ई, KL-५ येथील ३३ वर्षीय १ महिला कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेली आहे. सदर महिलेच्या शेजारच्या घरातील एक व्यक्ती गोवंडी बस डेपो येथे कंडक्टर म्हणून कार्यरत असून याअगोदरच ते कोव्हिड-१९ कोव्हिड १९ पॉझिटिव्ह आलेले आहेत. त्यांच्यापासूनच सदर महिलेला संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे.

खारघर: ३
खारघर, सेक्टर-१६, वास्तुविहार सोसायटी येथील १ व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेली आहे. ही व्यक्ती गोवंडी डेपो येथे बेस्ट कन्डक्टर म्हणून कार्यरत आहे. कामाच्या ठिकाणीच त्यांना संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे.

खारघर, सेक्टर-११, फ्रेंड सोसायटी येथील एकाच कुटुंबातील २ व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटिव्द आलेल्या आहेत. सदर कुटुंबातील कुटुंब प्रमुख चेंबूर येथे PSI म्हणून कार्यरत असून याआधीच कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेले आहेत. त्यांच्यापासूनच या दोघांना संसर्ग झाल्याचा अंतिम निष्कर्ष आहे.

रोडपाली: ४
रोडपाली, सेक्टर-१०, कुबेर पॅलेस येथील एकाच कुटुंबातील ४ व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेल्या आहेत. सदर कुटुंबातील कुटुंब प्रमुख चेंबूर येथे PSI म्हणून कार्यरत असून याआधीच कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेले आहेत. त्यांच्यापासूनच या चौघांना संसर्ग झाल्याचा अंतिम निष्कर्ष आहे.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!