पनवेल,दि.4 : गेल्या काही वर्षापासून पावसाळ्यामध्ये पनवेल महापालिका हद्दीमध्ये पूरस्थिती निर्माण होत आहे. त्यामुळे भविष्यात पूरस्थितीमुळे जिवीत हानी व वित्त् हानी होऊ नये यासाठी खबरदारी म्हणून पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील नद्यांचे पूररेषा सर्वेक्षण करणे गरजेचे होते. या विषयास महासभेने मंजूरी दिली.
यावेळी महापौर डॉ. कविता किशोर चौतमोल, उप महापौर सीताताई पाटील, आयुक्त गणेश देशमुख, अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, नगर सचिव तिलकराज खापर्डे उपस्थित होते.
प्रभाग समिती ‘ब’ कार्यक्षेत्रातील महापालिका मालकीचे श्री काळभैरव मंगल कार्यालय, कळंबोली गावातील ग्रामस्थांकरिता श्री समर्थ महिला मंडळ यांना नाममात्र दराने शासन मान्यतेने उपलब्ध करून देण्यास महासभेने मंजूरी दिली.
पनवेल महानगरपालिका मालकीचे आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहाचे व्यवस्थापन 3 वर्षाकरिता करण्याच्या निविदा प्रक्रियेस व खर्चास महासभेने मंजूरी दिली.
महिला बालकल्याण विभागा अंतर्गत कॅन्सर या दुर्धर आजाराने ग्रस्त असलेल्या महिलांना व मुलांना/मुलींना 25 हजाराचे अर्थसहाय्य योजना राबविणेबाबतच्या विषयास महासभेने मंजुरी दिली.
पनवेल महानगरपालिका मालकीच्या मलनि:स्सारण वाहिन्यांची दैनंदिन साफसाफाई करण्यासाठी ‘जेटिंग गारबींग ॲण्ड रोडींग मशीन असलेली 6 वाहने व सिव्हर सेक्शन कम जेटिंग मशीन विथ रिसायकलींगची(10,500 लिटर) 2 वाहने खरेदी करण्याच्या विषयास महासभेने मंजूरी दिली. तसेच या वाहनांचे परिचालन व देखभाल करणेकामी 5 वर्षाकरिता मनुष्यवळाचा पुरवठा करण्याच्या विषयास महासभेने मंजूरी दिली.
आजादी का अमृत महोत्सव” या उपक्रमांची पनवेल महानगरपालिका अंतर्गत प्रस्तावित रुपरेषेनुसार कार्यक्रम साजरा करण्याकरीता येणाऱ्या खर्चास महासभेची मान्यता दिली.