पनवेल दि.23: पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील शासकीय आणि खाजगी कोविड लसीकरण केंद्राचे लसीकरण व्यवस्थापक (सेशन मॅनेजर) यांची पालिकेच्या वैद्यकिय आरोग्य विभागाच्यावतीने बैठक घेण्यात आली. नगरसेवक मा.डॉ. अरूणकुमार भगत आणि पालिकेचे मुख्य वैद्यकिय आरोग्य अधिकारी डॉ. आनंद गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक घेण्यात आली.
तिसऱ्या टप्प्यात जेष्ठ नागरिकांचे लसीकरण सर्वत्र सुरू झाले आहे. खाजगी कोविड लसीकरणांमध्ये जेष्ठ नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठीच्या नियोजनाबद्दल चर्चा करण्यात आली. अपॉईमेंन्ट-वॉकिंग पॅटर्न( लसीकरणाबाबतचे नियोजन) तयार करण्याबाबत लसीकरण केंद्रांना सूचना देण्यात आल्या. लसींचा साठा, वेस्टेज दर कमी करण्याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. मा. आमदार प्रशांत ठाकूर यांनी जेष्ठ नागरिकांच्या लसीकरण केंद्राबाबत केलेल्या सुचनांवरही यावेळी चर्चा करण्यात आली.
या बैठकिस वैद्यकिय आरोग्य विभागाच्या डॉ. मनिषा चांडक, पालिका क्षेत्रात कोविड लसीकरण सुरू केलेल्या शासकिय आणि खाजगी लसीकरणकेंद्राचे व्यवस्थापक उपस्थित होते.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!