पनवेल दि.१८ (संजय कदम ) पनवेल महापालिकेचे माजी नगरसेवक राजू सोनी यांच्या तत्परतेने शहरातील सागर हॉटेल जवळ बंद पडलेला विद्युत पुरवठा सुरळीत झाला आहे. काल झालेल्या मुसळधार पावसात शहरातील मिडल क्लास सोसायटी सागर हॉटेलजवळ एमएसईबीची डीपी रस्त्यावर तुटून पडली होती. त्यावेळी तेथून माजी नगरसेवक राजू सोनी जात असताना त्यांना दिसली. त्यांनी तत्काळ महावितरणचे कर्मचारी बोलून पडलेली डीपी उभी करून घेतली व त्या डीपीला स्वखर्चाने वेल्डिंग करून दिली. त्यानंतर त्या परिसरातील विद्युत पुरवठा सुरळीत झाला. याबद्दल परिसरातील रहिवाश्यांनी त्यांचे आभार मानले आहेत.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!