पनवेल दि.१०: कोणताही आपत्कालीन प्रसंग असो लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी गरजूंना नेहमीच मदत केली आहे. त्याच अनुषंगाने कोरोना व्हायरस आणि लॉक डाऊन परिस्थिती पाहता गरीब गरजूंना पनवेल तहसील कार्यालयाच्या माध्यमातून जीवनावश्यक वस्तूंची मदत व्हावी, यासाठी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, सभागृह नेते परेश ठाकूर यांचाकडून २००० कुटुंबांना मदत होईल अशा जीवनावश्यक वस्तूंचे पॅकेट तहसील कार्यालयास सुपूर्द करण्यात आले. 
महापूर असो किंवा दुसरी आपत्ती दानशूर व्यक्तिमत्व लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सामाजिक भावनेतून मदतीसाठी नेहमीच पुढाकार घेतला आहे. स्वतः लोकांच्या मदतीला धावून जाणे हा त्यांचा पिंड आहे. लोकांवरील प्रसंग म्हणजेच आपल्यावर प्रसंग आहे, अशी भावना ठेवून ते काम करतात. आजच्या स्थितीत कोरोना आणि त्यामुळे लॉक डाऊन परिस्थिती आली आहे मात्र पनवेल क्षेत्रात कुणीही उपाशी राहू नये, यासाठी लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार प्रशांत ठाकूर, सभागृहनेते परेश ठाकूर जातीने लक्ष देत आहेत. त्यांच्या या मदत कार्यातून हजारो कुटुंबांना दिलासा मिळाला आहे.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!