पनवेल दि.११: विनोद नाखवा निर्मित विनोदाची मेजवानी असलेले ‘सुंदरा मनात भरली’ हे नाटक रविवार दि. १३ फेब्रुवारी २०२२ रोजी सायंकाळी ४.३० वाजता पनवेलच्या आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात होणार आहे.
‘सुंदरा मनात भरली’ या नाटकाच्या शीर्षकातच त्याचे कथाबीज दडलेले आहे. सुंदरा या केंद्रबिंदूच्या भोवती फिरणाऱ्या या लोकनाट्याचे लेखन दिग्दर्शन संतोष पवार यांचे आहे. या नाटकाचे संगीत ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की व गायन नंदेश उमप यांचे आहे. शीतल तळपदे यांची प्रकाश योजना, सुनिल देवळेकर यांचे नेपथ्य व केशभूषा मंगल केंकरे यांची आहे.
सुप्रसिद्ध रंगकर्मी संतोष पवार यांनी आतापर्यंत रंगभूमीवर अनेक नाटके दिली आहेत. आता ते एक नवे नाटक घेऊन आले आहेत. विनोदाची मेजवानी असलेल्या त्यांच्या ‘सुंदरा मनात भरली’ या नवीन नाटकाने सध्या रंगभूमीवर धमाल उडवली आहे. हास्य आणि विनोदाचा धमाल अनुभव देणाऱ्या या नाटकाने रंगमंचावर धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे या नाटकाला विनोदाची फोडणी असणारच हे नक्की, नाटकाचा बाज लोकनाट्याचा असला तरी त्यातल्या विविध प्रसंगांमुळे हे नाटक दोन घटका करमणूक करण्याची खात्री देते.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!