Amazonia-1 या ब्राझीलियन उपग्रहासोबत आणखी 18 उपग्रह आज यशस्वीरित्या लॉन्च करण्यात आले आहेत. आंध्र प्रदेश मधील श्रीहरिकोटा येथील सतिश धवन स्पेस सेंटर मधून हे उपग्रह आज सकाळी 10.24 वाजता लॉन्च करण्यात आले. Polar Satellite Launch Vehicle रॉकेट मधून लॉन्च करण्यात आले आहेत.
PSLV-C51 रॉकेटमध्ये ब्राझिलियन Amazonia-1 हे प्रमुख सॅटलाईट असून यासोबत 18 इतर सॅटलाईट सुद्धा लॉन्च करण्यात आले आहेत. Amazonia-1 हे National Institute for Space Research (NSIL) चे पृथ्वीचे ऑप्टिकल निरिक्षण करणारे सॅटलाईट आहे. NewSpace India Limited चे हे पहिले कमर्शियल मिशन आहे. 18 इतर उपग्रहांमध्ये IN-SPACe चे चार उपग्रह आणि NSIL चे 14 उपग्रह आहेत.
इंडियन स्पेस रिसर्च ऑरगनायझेशनचे 2021 चे पहिले अभियान यशस्वी झाले आहे.
