पनवेल दि.१२: सुधागड शिक्षण संकुलात स्व.शिक्षण महर्षी दादासाहेब लिमये यांच्या जयंती निमित्त घेण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा संपन्न झाला.
या स्पर्धेत कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर ज्यु. कॉलेजच्या कु. भूमी चिबडे हिने प्रथम क्रमांक पटकावला. चषक व रोख रक्कम असे या पारितोषिकाचे स्वरूप आहे. महाविद्यालयीन गटातून झालेल्या या स्पर्धेत ‘बदलते निसर्गचक्र’ या विषयावर भूमीने विचार मांडलेलेे होते. महिला दिनाचे औचित्य साधून हा सोहळा पार पडला. खासदार सुनिल तटकरे यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले. रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौंसिलचे सदस्य माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, स्कुल कमिटी चेअरमन आमदार प्रशांत ठाकूर, मुख्याध्यापिका स्वप्नाली म्हात्रे यांनी भूमी चिबडे हिचे कौतुक करत तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.