विजेत्या एकांकिकेला ०१ लाख रूपये आणि मानाचा अटल करंडक
पनवेल दि.०७: श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व चांगू काना ठाकूर महाविद्यालय (स्वायत्त) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येणाऱ्या मानाच्या अटल करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेला दि.०५ पासून पुणे येथील केंद्रातून प्राथमिक फेरीच्या उदघाटनाने प्रारंभ झाला. रामकृष्ण मोरे सभागृहात झालेल्या या प्राथमिक फेरीचे भाजपचे सांस्कृतिक सेलचे प्रदेशाध्यक्ष शैलेश गोजमगुंडे व अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखेचे उपाध्यक्ष परेश ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन झाले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सांस्कृतिक सेलचे प्रदेश सहसंयोजक उमेश धनसाली, दिग्दर्शक, अभिनेते व लेखक दीपक पवार, लेखक व अभिनेते राहुल वैद्य, तसेच अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखेचे प्रमुख कार्यवाह श्यामनाथ पुंडे, खजिनदार अमोल खेर, सांस्कृतिक सेलचे रायगड जिल्हाध्यक्ष अभिषेक पटवर्धन, सहसंयोजक गणेश जगताप, चिन्मय समेळ यांच्यासह कलावंत उपस्थित होते.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!