कॉलेजमध्ये फेस्टिव्हल सुरू झाले की काहींचा टेकफेस्ट असतो, तर कोणाचा एन्टरटेन्मेंट फेस्ट, कोणाचा म्युझिक तर कोणाचा अजून काही.. प्रत्येकांनी आपल्या स्ट्रिमप्रमाणे फेस्टिव्हल ठरवले आहेत. मग यात हॉटेल मॅनेजमेन्टची मुलं कशी बरं मागे राहतील. पनवेल येथील एस.पी.मोरे कॉलेज ऑफ हॉटेल टुरिजम अँड बिजनेस स्टडीज मधील विद्यार्थ्यांच्या फूड फेस्टिव्हलचं आयोजन नुकतंच केलं गेलं. यंदा या फूड फेस्टिव्हलमध्ये काय नवीन आहे याचा आढावा खमंग मेजवानी ने घेतला.