ठाणे दि.२४: डाॅ. अब्दुल कलाम कल्पकता केंद्रातर्फे गुरुवार २६ डिसेंबर रोजी गोदुताई परुळेकर उद्यान, चांदीवाला काम्प्लेक्स समोर,चंदनवाडी ठाणे पश्चिम येथे सर्वांना सकाळी ८-०४ ते १०-५५ वाजेपर्यंत दुर्बीणीतून खंडग्रास सूर्यग्रहण दाखवून मार्गदर्शन करण्यात येणार आहे. यावेळी खगोल अभ्यासक, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण उपस्थित राहून ग्रहण विषयक विशेष माहिती देणार आहेत. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य असणार आहे. तरी सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि खगोलप्रेमीनी या संधीचा लाभ घ्यावा. ग्रहण पाहण्यासाठी सोलर चष्म्यांची सोय करून देण्यात येणार आहे. अधिक चौकशीसाठी ९२२३८१०३८२ येथे संपर्क साधावा.