कोरोना विरोधात सोसायट्या सरसावल्या; जनजागृती साठी केला व्हिडियो तयार !
पनवेल दि.२१: कोरोना व्हायरस म्हणजेच सीओव्हीआयडी-19 संकटाचा सामना करण्यासाठी येत्या 22 मार्च (रविवार) रोजी सकाळी ७ वाजल्यापासून रात्री ९ वाजेपर्यंतच्या कालावधीत ‘जनता कर्फ्यू’ आयोजित करण्यात आला आहे. जनता कर्फ्यू म्हणजे जनतेने जनतेसाठी आयोजित केलेला कर्फ्यू. जनता कर्फ्यू काळात कोणताही नागरिकांनी घराबाहेर पडू नये. घरातच राहावे. देशातील सर्व राज्य सरकारांनी जनता कर्फ्यूचे पालन करावे, असे अवाहनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच केले. याचाच एक भाग म्हणून पनवेल मधील आदई गावातील बालाजी रेसिडेन्सी या सोसायटीतील सदस्यांनी मिळून “ANTI COVID 19 TEAM” ची संकल्पना अमलात आणली आहे. या बाबत सोसायटीतील सदस्य रमाकांत नवघरे यांच्या पुढाकाराने “जनता कर्फ्यू” पाळण्याची जवाबदारी सोसायटीमधील काही सदस्यांनी स्वीकारली आहे.
सदर टीम मार्फत खालील उपक्रम राबविण्यात येणार आहेत:
१) सकाळी 6.30am ला टीम मधील सगळे सदस्य तयार असतील.
२) सकाळी 6.55am ला शिट्टी वाजवून “जनता कर्फ्यू” बद्दल सावधान करण्यात येईल.
३) ठीक 7.00am पासून सोसायटी आवारात कोणालाही येऊ दिले जाणार नाही (खूप महत्वाचे काम असल्या खेरीज)
४) सोसायटी मध्ये बाहेरून येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीस किंव्हा बाहेर जाणाऱ्या व्यक्तीस हँड वॉश ने हात धुवुनच घरी पाठवण्यात येईल
४) पाणी आणि हँड वॉश सोसायटी मार्फत पुरवण्यात येईल
५) लहान मुले यांना खेळण्यास सक्त मनाई करण्यात येईल
६) संध्याकाळी 5.00 वाजता वेगळ्या पद्धतीने आभार व्यक्त करण्यात येईल, यामध्ये सुरवातीला सगळे जण घरात राहूनच टाळ्या वाजवून आभार मानतील. यानंतर राष्ट्रीय गान सोबत एन.सी.सी. गाण देखील होईल
७) सर्व सभासदांकडून एक थँक्स संदेश त्यांच्या घरातील सदस्य सोबत फोटो घेऊन सोसायटी whasapp ग्रुप वर पाठवतील.
८) रात्री 9.00 वा. जनता कर्फ्यू समाप्तीची घोषणा केली जाईल परंतु पुढील काही दिवस आपण संयमाने वागून जास्तीत जास्त वेळ घरातच रहावे असे सूचित करण्यात येईल. जेणेकरून हा लढा आपण यशस्वीपणे जिंकून आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडू.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!