आदर्श शैक्षणिक समूहाच्या श्री.बापूसाहेब डी.डी. विसपुते एम.एड व बी. एड. महाविद्यालयात शुक्रवार दि.२६ जून रोजी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती व सामाजिक न्याय दिन सकाळी ११.०० वाजता ऑनलाईन आयोजित करण्यात आला होता.
आदर्श शैक्षणिक समूहाचे चेअरमन धनराजजी विसपुते, संचालिका संगिता विसपुते यांच्या प्रेरणेने व महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.सीमा कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम करण्यात आला. सदर कार्यक्रमाची प्रारंभ स्वागात गीताने झाला, त्यानंतर पी.पी.टी.द्वारे छत्रपती शाहू महाराजांच्या कार्याची माहिती देण्यात आली. त्यानंतर विद्यार्थ्यानी आपल्या मनोगतातून शाहू महाराजांच्या विविध पैलू विषयी माहिती दिली, त्यानंतर प्रा. विजय मोरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या अध्यक्ष व महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सीमा कांबळे यांनी आपल्या प्रेरक शब्दातुन शाहू महाराजांच्या कार्याची महती वर्णन केली. शिक्षण क्षेत्रातील शाहू महाराजांचे विचार, ऐक्य परस्पर प्रेम विश्वास व चिकाटीचे सतत प्रयत्न ही आमची शस्र असली पाहिजेत असे शाहू महाराजांचे विचार त्यांनी सर्वांसमोर मांडले व आजच्या काळात त्यांचे विचार किती उपयुक्त आहेत ते विविध उदाहरणांच्या सहाय्याने स्पष्ट केले. या कार्यक्रमाच्या माध्यमातून सामाजिक न्यायाचे महत्व व लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची महती विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविण्यात आली.