पनवेल दि.३: रायगड जिल्हा बुद्धिबळ संघटना आणि व्ही जी पाटील एज्युकेशनल फाऊंडेशन,खिडकी आणि रोटरी क्लब ऑफ पाताळगंगा यांचे संयुक्त विद्यमाने रायगड जिल्हा स्तरीय खुली बुद्धिबळ स्पर्धा खिडकी अलिबाग येथे शनिवार दिनांक 2 ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आली होती. स्पर्धा सुरवातीला राष्ट्रपिता महात्मा गांधी, स्व. व्हीं जी पाटील सर आणि स्व.प्रभाकर पाटील यांचे प्रतिमेला हार अर्पण करून स्पर्धेला सुरुवात झाली. स्पर्धेत
शासकीय आदेशा प्रमाणे कोरोना चे नियम पाळून पन्नास स्पर्धकांना परवानगी देण्यात होती त्या प्रमाणे स्पर्धा घेतली गेली. त्यात अलिबाग,ऊरण, पनवेल, कर्जत, खोपोली, पेण, पाली, महाड तालुका येथील स्पर्धकांनी सहभाग घेतला. उद्घाटन समारंभासाठी रोटरी क्लब ऑफ पाताळगंगा चे अध्यक्ष गणेश काळे, मार्गदर्शक बालकृष्ण होनावळे, सदस्य सचिन थोरात, सुनील कुरुप तसेच रायगड जिल्हा बुद्धिबळ संघटना अध्यक्ष विलास म्हात्रे, उपाध्यक्ष पी आर पाटील, सेक्रेटरी संदीप पाटील, सदस्य नंदकुमार पालवे, गोपीनाथ डंगर, सुशील गुरव उपस्थित होते स्पर्धा यशस्वी करण्यासाठी साठी अल्हाद पाटील, वैभव पाटील, दर्शन पाटील, राजेंद्र पाटील यांनी मेहनत घेतली. स्पर्धेसाठी प्रमुख पंच चंद्रशेखर पाटील, विलास म्हात्रे, गोपीनाथ डंगर, अंकित जोशी तसेच संगणक पंच म्हणून श्रेयस पाटील यांनी काम पाहिले. बक्षीस समारंभासाठी हास्य सम्राट संजीवन म्हात्रे, व्ही जी पाटील एज्युकेशनल फाऊंडेशनचे विश्वस्त अल्हाद पाटील, राजेंद्र पाटील, ज्ञानेश्वर पाटील, महेंद्र म्हात्रे, अमित कदम उपस्थित होते. स्पर्धे साठी 11 बक्षिसे व ट्रॉफी जाहीर करण्यात आली होती. स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचा मानकरी सर्व फेऱ्या जिंकणारा पनवेलचा स्नेहल भोसले (6/6) अपराजित राहिला. द्वितीय क्रमांक सन्मील गुरव (5/6)अलिबाग, तृतीय क्रमांक धीरज पाटील(5/6) ऊरण, चतुर्थ क्रमांक गणेश पाटील(5/6) अलिबाग, पाचवा क्रमांक संतोष मनोहर (5/6) रसायनी, सहावा,आदित्य पाटील (4.5/6) पेण, सातवा,वेदांती मयेकर, आठवा,हिमांशू डंगर, नववा आविष्कार (4.5/6) अलिबाग, दहावा अमित कदम (4/5) खारघर, अकरावा,पुर्वा पेडणेकर (4)/6) अलिबाग यांनी नंबर पटकाविले. महिलांमध्ये वर्षा पाटील तर ज्येष्ठ नागरिक मिलिंद पाटील यांना उत्तेजनार्थ बक्षिसे देण्यात आले. सर्वांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात आली स्पर्धा अत्यंत उत्साहात व चुरशीच्या झाल्या . कोरोना काळा नंतर पहिल्यांदा स्पर्धा झाल्यामुळे स्पर्धक आनंदात होते. एका खेडेगावात आणि कब्बडीच्या गावात बुद्धिबळाच्या रोपटे वाढत आहे आणि अश्या प्रकारे बुद्धिबळाचा प्रसार सर्व गावांत झाला पाहिजे असे मत विलास म्हात्रे यांनी व्यक्त केले व ही संधी आल्हाद पाटील यांनी दिल्याबद्दल त्यांचे कौतुक करून संघटने तर्फे आभार मानले.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!