पनवेल दि.१६: शेतकरी कामगार पक्षाचे आदई येथील कार्यकर्ते पद्माकर पांडुरंग शेळके यांनी त्यांच्या सहकार्यांसह भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.
आमदार प्रशांत ठाकूर यांनी सर्व प्रवेशकर्त्यांचे पक्षात स्वागत केले.
नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर विद्यालयात (सीकेटी) आज झालेल्या या पक्षप्रवेश कार्यक्रमास माजी नगरसेवक अॅड. मनोज भुजबळ, प्रकाश बिनेदार, माजी पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, भाजप नेते धर्माशेठ काकडे, अनंता पाटील, जगदीश शेळके, माजी सरपंच महादू शेळके, उपसरपंच योगेश पाटील, ग्रामपंचायत सदस्य श्रीचन भंडारी, राजेश काकडे, विजय शेळके, नितेश पाटील, राहुल पाटील, रोहित पाटील, सुरज म्हात्रे, सचिन भोईर, कैलास पाटील, कृणाल सते, एकनाथ शेळके, ज्ञानेश्वर पाटील, राम शेळके, जनार्दन पाटील, जयराम शेळके, जयेश पाटील, बाळकृष्ण मोकल, भावेश शेळके, मंगेश भोपी, दत्त शेळके यांच्यासह इतर पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
या पक्षप्रवेश प्रसंगी आदई गावातील शेकापचे कार्यकर्ते पद्माकर पांडुरंग शेळके यांच्यासह प्रवीण शेळके, मोहम्मद इस्लाम, गौतम गायकवाड, समीर अन्सारी, शार्दूल अन्सारी, अकबर अन्सारी, कलीम अन्सारी, प्रकाश यादव, अरुण पासवान, कलीम मोहम्मद अन्सारी, अक्रम अन्सारी, अझर अन्सारी, मनीर अन्सारी, राजू शर्मा, प्रवीण मराठे, रोहित ननवरे, श्रीकांत घोलप, विकास सोमवंशी, ओमनाथ निगुरुषे, सुनील शिर्के, योगेश शेळके यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला.
