पनवेल दि.१७: गेल्या २५ वर्षांहून अधिक काळ शेकापच्या ताब्यात असलेल्या खेरणे ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकीत थेट सरपंचपदी भाजपचे शैलेश बाळाराम माळी बहुमतांनी विजयी झाले आहेत.
पनवेल तालुक्यात रविवारी एकमेव खेरणे ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक पार पडली. आज या ग्रामपंचायतीचा निकाल जाहीर झाला. गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी शेकापची सत्ता राहिली होती. हि सत्ता उलथवून टाकण्यासाठी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या कार्यकर्त्यानी विशेष मेहनत घेतली. शेकापने सत्तेचा वापर नेहमीच स्वतःच्या स्वार्थासाठी केले आहे. हे तेथील जनतेला कळून चुकले आहे, त्यामुळे मतदारांनी भाजपला कौल दिला. सरपंच पदी शैलेश माळी यांना विजयी केले. तसेच रुपाली चंद्रकांत गोंधळी, राजेंद्र आत्माराम गोंधळी, अशोक गणपत गोंधळी, सुभद्रा संतू माळी, अक्षता सचिन पाटील हे भाजपचे उमेदवार विजयी झाले. या सर्वानी भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, अरुणशेठ भगत यांची सदिच्छा भेट घेत जल्लोष केला. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर, तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत व इतर पदाधिकाऱ्यांनी विजयी उमेदवार तसेच कार्यकर्त्याचे अभिनंदन केले. यावेळी तालुका उपाध्यक्ष सचिन पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य एकनाथ देशेकर, माजी पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, शिक्षक सेलचे जिल्हा संयोजक के. सी. पाटील, बुधाजी माळी, महेश पाटील, प्रकाश खैरे यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!