पुणे दि.३: प्रसिद्ध निसर्गकवी ना. धो. महानोर यांचं निधन झालं आहे. ते ८१ वर्षांचे होते. पुणे येथील रुबी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. निसर्गकवी, रानकवी म्हणून त्यांना ओळखले जात असे. ते संत साहित्याचे गाढे अभ्यासक होते. मराठी कवीता आणि गीते यांमध्ये येणारे विविध काव्यप्रकार त्यांनी हाताळले. खास करुन नामदेव धोंडो महानोर असे पूर्ण नाव असलेला हा कवी खरा प्रगतीशील शेतकरी म्हणूनही ओळखला जात असे.
मराठी साहित्यातील रानकवी, ना. धो महानोर
ना धो महानोर यांचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील पळसखेड येथे 16 सप्टेंबर 1942 मध्ये झाला. निसर्गात रमणारा कवी अशी त्यांची ओळख होती. त्यांनी आपल्या कवीतांमध्ये खास करुन बोलीभाषांचा वापर केला. त्यांनी विविध वृत्तपत्रांसाठी लेखही लिहीले. महानोर यांनी आपल्या साहित्यात काहीवेळा मराठीच्या बोलीभाषांचा वापर केला आहे.