पनवेल दि.9: माथेरान येथील ज्येष्ठ पत्रकार आणि महाराष्ट्र न्यूज 24चे संपादक संतोष पवार (वय 54) यांचे आज सकाळच्या सुमारास वेळीच उपचार उपलब्ध न झाल्याने निधन झाले. संतोष पवार यांनी रायगड प्रेस क्लबचे अध्यक्षपद भूषविले आहे. माथेरान नगर परिषदेचे स्वीकृत नगरसेवक म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते तसेच अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे सरचिटणीस म्हणून आपल्या कामाचा ठसा उमटविला होता. दोन वर्षांपूर्वी त्यांनी महाराष्ट्र न्यूज 24 हे यू ट्यूब चॅनेल सुरू केले होते.
पवार यांना आज पहाटेच्या सुमारास श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांना कर्जत येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. उपजिल्हा रुग्णालयात पुरेशी सुविधा उपलब्ध नसल्याने त्यांना नवी मुंबईतील डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये नेण्याचा निर्णय घेण्यात आला. तेथे नेत असताना खालापूर तालुक्यातील भिलवलेनजीक 108 अ‍ॅम्ब्युलन्समधील टाकीतील ऑक्सिजन संपला. त्यानंतर दुसरी ऑक्सिजन टाकी लावत असताना त्यातील प्रेशरने पूर्ण ऑक्सिजन बाहेर पडला. त्यामुळे त्यांना लगेचच ऑक्सिजन उपलब्ध होऊ शकला नाही. अशातच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, पुत्र, कन्या, भाऊ, भावजय, पुतणे असा परिवार आहे.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!