अलिबाग (उमाजी केळुसकर) – ज्येष्ठ नागरिक संस्था, भालनाका ही परिसरातील ज्येष्ठांचा आधारवड असून या संस्थेचे सामाजिक कार्यही तेवढेच तोलामोलाचे आहे, असे गौरवोद्गार साहित्यिक, वरिष्ठ पत्रकार उमाजी केळुसकर यांनी काढले. ज्येष्ठ नागरिक संस्था, भालनाकाची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच जनाधार ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या सभागृहात आयोजित करण्यात आली होती. ही सभा ज्येष्ठ नागरिक संस्था, भालनाकाचे अध्यक्ष श्रीरंग घरत यांच्या अध्यक्षतेखाली झाली. याप्रसंगी व्यापीठावर प्रमुख पाहुणे साहित्यिक उमाजी केळुसकर, जनाधार ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष विकास काठे, ज्येष्ठ विधीज्ञ ऍड. के.डी. पाटील,ज्येष्ठ नागरिक संस्था, भालनाकाचे उपाध्यक्ष तुकाराम म्हात्रे, सचिव सुधाकर घरत, सहसचिव नवीनचंद्र राऊत, खजिनदार मधुकर पाटील, तसेच कार्यकारणी कमळाकर राऊत, गजानन पाटील, कृष्णा दळवी, विठोबा म्हात्रे, नामदेव सानकर, नरेश नाईक, उर्मिला म्हात्रे, महादेव भगत, सखाराम जंगम, गोपीनाथ सुतार, रामदास म्हात्रे, सीताराम पाटील, अपर्णा घरत, ऍड. प्रकाश कानडे, विजय भगत आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना साहित्यिक उमाजी केळुसकर यांनी संस्थेच्या कार्याचे कौतुक करुन शुभेच्छा दिल्या. ज्येष्ठ नागरिक संस्था, भालनाकाचे अध्यक्ष श्रीरंग घरत यांनी संस्थेच्या कार्याचा परिचय उपस्थितांस करुन दिला. तर संस्थेचे सचिव सुधाकर घरत यांनी अहवाल वाचन केले. याप्रसंगी आजारी महिला व निराधार महिलांस मदत देण्यात आली, तसेच विविध क्षेत्रात चमकदार कामगिरी करणार्‍या ज्येष्ठ नागरिक संस्था, भालनाकाच्या सदस्यांचा आणि त्यांच्या नातवंडांचा यावेळी गुणगौरव करण्यात आला. यात विजय भगत, सीताराम पाटील, बिपीन राऊत, विलास पाटील, मयुर प्रभाकर म्हात्रे, नवीनचंद्र राऊत, मनोहर म्हात्रे, तसेच अंश किरण केणी, माही संदीप पाटील, दृष्टी राकेश म्हात्रे, लावण्य विवेक म्हात्रे, रुग्वी गणेश म्हात्रे, दक्ष नितीन सानकर, दुर्वी किरण केणी, कैवल्य विवेक म्हात्रे, चिन्मय रमेश म्हात्रे, मीरा नितीन म्हात्रे, शुभम समीर घरत, वेणू हर्षद घरत, दिव्या किशोर सुतार, सार्थक सत्यजित म्हात्रे, आदिती किरण पाटील, वैष्णवी अमर पाटील, हिमांशु अनंत म्हात्रे या विद्यार्थी-विद्यार्थिनींचा भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. याबरोबर चालू महिन्यात ज्या ज्येष्ठ नागरिकांचे वाढदिवस होते, त्यांचेही यावेळी अभीष्टचिंतन करण्यात आले.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!