पनवेल दि.4 : पनवेल महापालिका हद्दीत कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढू लागल्याने पालिकेने पाच किंवा पाचपेक्षा अधिक कोरोना बाधित रूग्ण आढलेल्या सोसायट्या कोरोना बाधित क्षेत्र (कंटेनमेंट झोन) म्हणून घोषित करण्यास सुरूवात केली आहे. कोमोठे, कळंबोली, खारघर, पनवेल शहर, खांदा कॉलनी, नवीन पनवेल पालिका या भागात कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत.
कामोठे – ४,कळंबोली – 3,खारघर – 5, खांदा कॉलनी – 1, पनवेल – 2. येथील भागातील पाच किंवा पाच पेक्षा जास्त रुग्ण असणाऱ्या सोसायट्या सील करण्यात आल्या आहेत.
कामोठे येथील सेक्टर पाचमधील क्रिस्टल प्लाझा, प्लॉट नं 22, सेक्टर 35 मधील सतलज रेसिडन्सी प्लॉट नं.8बी, सेक्टर 36 मधील तिरूपती कॉम्लेप्स प्लॉट नं. बी 7 ,सेक्टर 19 मधील प्रिशिअस रेसिडेन्सी, कळंबोली येथील सेक्टर 20 मधील प्लॅटिनम ॲव्हिअर, सेक्टर 3 मधील एल.आय.जी. -1 रूम नं जे 34, स्टील मार्केट, प्लॉट नं 826, नवीन पनवेल मधील खांदा कॉलनीतील सेक्टर 08 मधील गार्डन व्ह्यू सोसायटी, पनवेल मधील साई नगर मधील मुनोत रिजन्सी सी विंग, ओरिअन मॉल जवळील बी.डी.टी.ए अपार्टमेंट,खारघर येथील सेक्टर 35 मधील साई स्प्रिंग, सेक्टर 34 सी सिमरन सोसायटी,सेक्टर 35 जी महावीर हेरिटेज सोसायटी, सेक्टर 35 जी गॅलेक्सी सोसायटी,सेक्टर 35 जी हाईड पार्क, हे सगळे कोरोना बाधित क्षेत्र (कंटेनमेंट झोन) म्हणून घोषीत करण्यात आले आहे.
सध्या ( 3 मार्च) पनवेल पालिका क्षेत्रात कळंबोली 153, कामोठे 83, खारघर 115, नविन पनवेल 117, पनवेल 56, तळोजा 47 कोरानाचे रूग्ण आहेत. कोरोनाचा संसर्ग रोखायचा असेल तर मास्क वापरणे, सोशल डिस्टसिंगचे पालन करणे, सॅनिटायझर वापरणे, या त्रिसूत्रीचे पालन सर्वांनी करावे असे पालिकेच्यावतीने सातत्याने सांगितले जात आहे. गृह निर्माण सोसायटीमध्ये पाच किंवा पाच पेक्षा जास्त कोरोना पॉझीटीव्ह रूग्ण असतील तर अशा सोसायटीनी महानगरपालिकेशी संपर्क साधवा, तसेच सोसायटीतील संबधित सदनिका सॅनिटाईझ करण्यासाठी देखील पालिकेशी संपर्क साधावा. असे पालिकेच्यावतीने सांगण्यात आले आहे.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!