मुंबई दि.०१:: येत्या शनिवारी ४ डिसेंबर रोजी कार्तिक अमावास्येच्या दिवशी यावर्षातील शेवटचे खग्रास सूर्यग्रहण होणार आहे , परंतू हे सूर्यग्रहण भारतातून दिसणार नसल्याचे पंचांगकर्ते, खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी सांगितले. या सूर्यग्रहणाविषयी अधिक माहिती देतांना सोमण म्हणाले की, या सूर्यग्रहणाचा प्रारंभ पृथ्वीवर सकाळी १० वाजून ५९ मिनिटांनी होणार असून ते दुपारी ३ वाजून ७ मिनिटांनी संपणार आहे. हे सूर्यग्रहण आफ्रिकेचा दक्षिण भाग, अमेरिकेचा दक्षिणेकडील प्रदेश, आस्ट्रेलियाचा दक्षिण प्रदेश, अटलांटिक, प्रशांत, हिदीमहासागर आणि अंटार्क्टिक प्रदेश येथून दिसणार आहे. भारतातून दिसणारे सूर्यग्रहण पुढल्यावर्षी मंगळवार, दि.२५ आक्टोबर २०२२ रोजी होणार असल्याचेही दा.कृ. सोमण यांनी सांगितले.