पनवेल दि.६: रायगड जिल्हा परिषदेच्या वतीने देण्यात येणारा रायगड जिल्ह्यातील सर्वोच्च सन्मान म्हणजेच रायगड भूषण पुरस्कार वितरण सोहळा आज अलिबाग येथील पीएनपी नाट्यगृहात पार पडला ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यातील आदिवासींच्या मूलभूत हक्कांसाठी संघर्ष करणारे सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर यांचाही रायगड भूषण पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. ठाकूर यांनी पळस्पे-इंदापूर राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीच्या माध्यमातून महामार्ग बाधित प्रकल्पग्रस्तांचा यशस्वी लढा लढुन सुरवातीला सुमारे अडीच हजार प्रकल्पग्रस्तांना मिळवून दिला व त्यानंतर राज्यात इतर सर्व सरकारी प्रकल्पांना याच कायद्यानुसार मोबदला देण्याचा निर्णय शासनास घ्यावा लागला संतोष ठाकूर हे अनाथ,आदिवासी वंचित आणि गरीब बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी “बालग्राम प्रकल्प” चालवत आहेत रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या सोहळ्यात आमदार बाळाराम पाटील,जि.प. अध्यक्षा योगिता पारधी, उपाध्यक्ष सुधाकर घारे,जि प सी.ई.ओ.किरण पाटील,स्थायी समिती सभापती ऍड. नीलिमा पाटील, माजी आमदार सुभाष पाटील माजी राज्यमंत्री मीनाक्षी पाटील चंद्रकांत कळंबे, जि.प. सदस्य चित्रा पाटील, डी. बी.पाटील आदी मान्यवर उपस्थित होते

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!