रत्नागिरी दि.१४ (सुनिल नलावडे) रत्नागिरीतील नामांकीत हरहुन्नारी कलाकार असलेले मॉडेलींग व व्यावसायिक छायाचित्रकार संजीव साळवी कोरोना संसर्गावर उपचार सुरू असताना ह्रदय विकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्यावर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू होते.
संजीव साळवी नुसते कलाकारच नव्हे तर निवेदक , उत्तम गायक, नकलाकार,कवि होते. फोटोग्राफी क्षेत्रात त्यांचे वडील स्व. हरीशचंद्र साळवी यांचा वारसा लाभला असुन स्मृति स्टुडिओच्या माध्यमातुन ते परिचित होते. साळवी कुटुंबात फोटोग्राफी बरोबरच नाट्य अभिनय क्षेत्रातही त्यांनी नाव कमवले आहे. त्यांची बहिण नाट्य संगित क्षेत्रातील कलाकार म्हणून रत्नागिरीकरांना परिचित आहे. कला क्षेत्रातिल यशात त्यांच्या पत्नीचाही मोठा वाटा आहे. त्याही कलेच्या क्षेत्रातील जाणकार आहेत.
रत्नागिरीतील यशा नंतर आपल्या कलेचा विस्तार करताना त्यांनी गोव्यात पाऊल टाकताना छोटया पडद्यावरील मालिकांच्या शुटिंग आदि. क्षेत्रात यशस्वी पदारपण केले कोकण सुंदरी सारख्या स्पर्धा मध्ये अँकरींग आदींसह कलाकारांना मार्गदर्शन प्रशिक्षण देण्याचे काम करायचे त्यामुळे ते कला व सांस्कृतीक क्षेत्रात ते लोकप्रिय झाले होते. फोटाग्राफी क्षेत्रात त्यांनी अनेक युवकांना मार्गदर्शन कले .
संजीव साळवी यांच्या निधनाने जिल्हाभरातील फोटोग्राफर संघटनांनी श्रद्धांजली वाहून आपले स्टुडियो बंद ठेवले .
संजीव साळवी यांनी नुकतेच यु ट्यूब मध्ये पदार्पण करताना “कसक द पोएट्री” चॅनल सुरू करून अनेक कलाकारांना सांस्कृतीक दालन मिळून दिले होते .
संजीव साळवी यांच्या पश्चात पत्नी,मुले,फोटोग्राफर भाऊ व बहीणी आदी. असा परिवार आहे.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!