पनवेल दि.७: रामशेठ ठाकूर इंटनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स हे येणारया पुढील काळात करीयर घडवण्याचे सेंटर बनत आहे, असा विश्वास आमदार प्रशांत ठाकूर यांनी बक्षीस वितरण समारंभावेळी केले. रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आणि बॅडमिंटन ऑर्गनायझेशन ऑफ रायगडच्यावतीने ‘रामशेठ ठाकूर बॅडमिंटन ट्रॉफी’ ही बॅडमिंटन स्पर्धा आयोजीत करण्यात आली होती. ही स्पर्धा पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ४ ते ६ ऑगस्ट दरम्यान उलवेनोड येथील रामशेठ ठाकूर रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स मध्ये रंगली. या स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभ माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर आणि भाजपचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार संदीप नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
उलवे नोड मधील रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये हि स्पर्धा ११, १३, १५ आणि १७ वर्षाखालील मुले आणि मुली गटात तसेच महिला, पुरुष खुला गटात झाली. या स्पर्धेतील विजेत्यांना चार लाख रुपयांची बक्षिसे देण्यात आली असून, प्रथम, द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ क्रमांकास सन्मानचिन्ह, पारितोषिक रक्कम देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. या स्पर्धेत ११ वर्षाखाली मुलांच्या गटात युवराज सिंग, मुलींच्या गटात सान्वी गणेश सुर्यवंशी, १३ वर्षा खालील मुलांच्यागटात हिमांशू प्रिती सचीन भटकर, मुलींच्या गटात अदीती यादव, १५ वर्षाखाली मुलांच्या गटात यु.ई. सीद्धार्थ, मुलींच्या गटात अनरीया सिंग, १७ वर्षाखालील मुलांच्या गटात यु.ई. साई सीद्धार्थ, १९ वर्षाखालील मुलांच्या गटात सुजल कोठारी, मेन्स सिंगल गटात जग्नेश जैन, मेन्स डबल गटात जीनेश जैन आणि साईदीनेश रेड्डी, वुमन्स सींगल गटा दीप्ती परांजपे पुरोहीत, महिला दुहेरी गटात नीशा राणी आणि दीप्ती परांजपे पुरोहीत, मीक्स डबल गटात जिग्नेश जैन आणि अल्का करायील, ४० प्लस गटात जयदेव बालक्रीष्णन आणि प्रशांत मुखर्जी यांनी प्रथम क्रमांत पटाकावला. सर्व विजेत्यांना उपस्थित मान्यवरांच्याहस्ते सन्मानचिन्ह, पारितोषिक रक्कम देऊन गौरविण्यात आले. तसेच कोरिया येथे होणाऱ्या महिला एकेरी ३५ प्लस मध्ये भअरताने प्रतिनिधीत्व करण्यासाठी निवड झालेल्या डॉक्टर दिप्ती पुरोहीत, कोरिया मध्ये होणाऱ्या ३५ प्लससाठी भारताचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी निवड झाल्याबद्दल पियुष अग्रवाल, कोरियामध्ये होणाऱ्या पुरुष दुहेरी साठी निवड झालेले सनी दुगल, बल्गेरिया येथे पार पडलेल्या स्पर्धेत नुकताच गोल्ड मेडल, ऑल इंडिया ज्युनियर चॅम्पियनशिप सिंगलमध्ये रनर अप, १७ वर्षाखालील गटात मध्ये देशात सहावा क्रमांक पटकावलेली कुमारी रक्षा कंदास्वामी, तसेच ग्रेड टूच्या लेखी परिक्षेत संपूर्ण भारतात प्रथम क्रमांक पटकावणारे योगेश पाटील यांचा विषेष सत्कार या कार्यक्रमात करण्यात आला.