रत्नागिरी दि.२१ (सुनिल नलावडे) तळ कोकणात पावसाचे थैमान सलग सुरु असुन ग्रामीण भागात प्रचंड दहशत निर्माण केली आहे . मुसळधार पावसामुळे भुगर्भातील प्रवाहांनमुळे रत्नागिरी राजापूर संगमेश्वर तालुक्यासह अनेक ठिकाणी भुस्कलनाचे प्रकार घडल्याने नागरिकांचे स्थलांतर करण्याची वेळ आली असुन घरांची मोठया प्रमाणात हानी झाली आहे. रत्नागिरीला पाणीपुरवठा करणाऱ्या शीळ धरणाच्या सांडव्या जवळ भुस्कलन झाल्यामुळे डोंगराचा काही भाग खचण्याची भीती निर्माण होवून शीळ धरणाला धोका निर्माण झाला. आता पर्यंत तब्बल चाळीस गुंठे जमिन खचल्याने आंबा काजुची 40-45 कलमे उन्मळून गेली आहेत.
राजापुरमध्ये आज सलग तिसऱ्या दिवशी सुध्दा पुरस्थीती निर्माण झाली असुन अनेक भागात पुराचे पाणी घुसले. अर्जुना आणी कोदवली या दोन्ही नदयांना आलेल्या पुराचे पाणी राजापुर बाजारपेठेत घुसले पुराच्या पाण्यात रायपाटण मधील एक वृध्द वाहून गेल्याची घटना घडली. धोपेश्वर आणी साखरकोंबे गावात जमिनीला भेगा पडल्या आहेत. त्यामुळे शहर व परिसरातील जनजीवन कोलमडले असुन वाहून गेलेल्या इसमाचे नावविजय पाटणे (वय 65) असे असुन ते गावात पावणे आले होते. गांगणवाडी येथील पुलावर पाणी आल्याने ते पाण्याबरोबर वाहून गेले. गेले पाच दिवसापासून मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे मुंबई-गोवा हमरस्त्यावरील भोस्ते घाटात दोन ठिकाणी दरड कोसळली त्यामुळे डोंगराच्या बाजुकडील रस्ता बंद पडला आहे. आज आंबा घाटात कोसळलेली दरड बाजु करण्यात आलेली असली तरी रस्त्यावर मोठे झाड पडल्याने वाहतुक खंडीत झाली होती.
जगबुडी आणी नारंगी या दोन्ही नदयांनी धोक्याची पातळी ओलांडली असुन सलगपणे शहरातील मच्छीमार्केटमध्ये पुराचे पाणी घुसले तर अनेक दुकानात पाणी शीरले त्यामुळे दापोली, खेड मार्गासह अंतर्गत रस्ते पाण्याखाली गेल्याने वाहतुकीवर त्याचा परिणाम झाला आहे. खाडी पट्टयातील अनेक गावांचा संपर्कही तुटला आहे. दरम्यान कोकणात तुफान पाऊस पडत असुन रत्नागीरी जिल्हयात तब्बल 2042 मिली मिटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे. मागील 24 तासात 102 मिलीमिटर इतका पाऊस पडला आहे. मंडणगड मध्ये 2148 मिलीमिटर, दापोलीमध्ये 1797, खेड 2312, गुहागर 2264, चिपळूण 1795, संगमेश्वर 1959, रत्नागिरी 2334, लांजा 1950, राजापुर 1825 अशी नऊ तालुक्यातील एक जुन ते वीस जुलै इतकी नोंद झाली आहे.
आज दापोली तालुक्यातील आघारी गावामध्ये समुद्रकिनारी अंदाजे 30 ते 40 वयोगटातील पुरष जातीचे 2 मृतदेह आढळून आलेले आहेत पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत, मृतदेहाची ओळख पटवणेचे काम चालु आहे तलाठी व मंडळ अधीकारी पण घटनास्थळी आहेत एका मृतदेहाची ओळख पटली असल्याचे सांगण्यात आले.
राजापूर – नाटे- पावस – रत्नागिरी या प्रमुख राज्य मार्गावर तिठवली गावाजवळ मुख्य रस्ताचा एक बाजूने सुमारे १०० फूट रस्ता खचला आहे.यामुळे प्रशासनाने सदर मार्ग अवजड वहातुकीसाठी बंद केला आहे.