पनवेल दि.२६: पनवेलमध्ये झालेल्या राज्यस्तरीय आमदार प्रशांत ठाकूर चषक भव्य दिव्य कबड्डी स्पर्धेच्या अंतिम रोमांचक लढतीत सरस कामगिरी करत रायगड जिल्ह्याच्या मिडलाईन संघाने विजेतेपद तर चिपळूणच्या दसपट्टी संघाने उपविजेता होण्याचा मान पटकाविला. अत्यंत उत्तम आणि शिस्तबद्ध आयोजनामुळे प्रो कबड्डीचा थरार या ठिकाणी क्रीडा रसिकांना अनुभवायला मिळाला. रविवारी रात्री झालेल्या स्पर्धेच्या अंतिम दिवशी एकाहून एक दिलखेच सामने पहायला मिळाले. महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन व रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या मान्यतेने जय भवानी नवतरुण मंडळाच्या वतीने धरणा कॅम्प येथे पार पडलेल्या या स्पर्धेच्या विजेत्यांना रायगडचे माजी पालकमंत्री रविंद्र चव्हाण, विधान परिषदचे आमदार निरंजन डावखरे यांच्या हस्ते आणि भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी आमदार रविंद्र चव्हाण आणि आमदार निरंजन डावखरे यांनी उत्कृष्ट आयोजनाबद्दल कौतुक केले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील, महानगरपालिकेचे सभागृहनेते परेश ठाकूर, महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे निरीक्षक मालोजी भोसले, भाजपचे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष ऍड. महेश मोहिते, उत्तर रायगड जिल्हा संघटन सरचिटणीस अविनाश कोळी, जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद केणी, नगरसेवक हरेश केणी, प्रभाग समिती सभापती संजना कदम, नगरसेवक नितीन पाटील, विकास घरत, विजय चिपळेकर, नगरसेविका राजेश्री वावेकर, मोनिका महानवर, युवा नेते दिनेश खानावकर, दिनेश केणी, राजेश मपारा,सोपान जांभेकर, पंच प्रमुख सतिश सुर्यवंशी, सुर्यकांत ठाकूर, ज्येष्ठ कार्यकर्ते सुभाष कदम, युवा नेते समीर कदम, सतिश कदम, मंडळाचे अध्यक्ष शेखर कदम, सचिव प्रशांत कदम, खजिनदार जितेंद्र कदम यांच्यासह पदाधिकारी, आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महाराष्ट्रात हुतूतू… बंगालमध्ये हुडूडू… चेन्नईत चेडूयुडू… केरळमध्ये वंडीवडी… उत्तर भारतात कोनवरा, साबरगण्णा… पंजाब राज्यात झाबर गंगा, सौची पक्की अश्या वेगवेगळया नावांनी आणि थोडयाफार फरकाने हा खेळ खेळला जात होताच पण या खेळाला सर्वदुर एकच नाव असाव या करता महाराष्ट्र राज्याने प्रयत्न केले आणि अनेक भाषांची ही प्रादेशिकता जाऊन भारतात हा खेळ ’कबड्डी’ या नावाने ओळखला जातो. मैदानी या खेळाने देशात क्रीडा प्रकारात एक मानाची उंची राखली, त्याप्रमाणे या खेळाला आणि खेळाडूंना सन्मान देण्याचे काम पनवेल तालुक्यातील धरणा कॅम्प येथे झालेल्या ‘राज्यस्तरीय आमदार प्रशांत ठाकूर चषक भव्य दिव्य कबड्डी’ स्पर्धेने केले. मैदानी खेळाची हि परंपरा टिकवण्यासाठी नवनवीन संकल्पना आखण्यात येतात त्याच अनुषंगाने जणू प्रो कबड्डीचे सामने या मैदानावर होत आहेत आणि एकाहून एक सरस चढाईने यामध्ये रोमांचक थरार पहायला मिळाला. हार जीत होतच असते पण शिस्तबद्ध आणि सुंदर नियोजन या ठिकाणी डोळ्यांचे पारणे फेडणारे होते. कबड्डीतील ज्येष्ठ खेळाडूंचा सन्मानही या ठिकाणी होताना त्यांच्या प्रती आदरभाव अधोरेखित होत होता. सूत्रसंचालन प्रो कबड्डीचे प्रसिद्ध समालोचक मिलिंद पाटील व किशोर गावडे यांनी केले. आपल्या वक्तृत्व शैलीने त्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली. दिनांक २२ ते २४ एप्रिल पर्यंत झालेल्या या स्पर्धेत अनेक सामने थरारक झाले. शेवटच्या क्षणापर्यंत निकाल काय लागणार याची उत्कंठा शिगेला पोहोचली होती. आणि त्याचा मनमुराद आनंद प्रेक्षकांनी अनुभवला.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!