पनवेल दि.६: महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा रायगड व प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पेण, यांचे संयुक्त विद्यमाने रायगड जिल्हा तांदूळ व धान्य महोत्सवाचे आयोजन पनवेल येथे करण्यात आले.
लाल, काळा, जांभळा भात तसेच इतर सुवासिक इंद्रायणी, बारीक जातीच्या वाडा कोलम, शुभांगी वाय एस आर इतर तांदूळ, कडधान्य,भाजीपाला विक्री दालने, सेंद्रिय शेतकरी, गटांची शेतमाल विक्री, महिला बचत गट उत्पादने-मसाला, पापड, लोणची इत्यादी प्रदर्शन व विक्री केली गेली.