महापालिका आणि पिल्लई कला,वाणिज्य् आणि विज्ञान महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमानातून पर्यावरणाचा जागर
पनवेल,दि.27: माणसाचा हव्यास वाढतो आहे. त्यामुळे हवामानात बदल होत आहे. ‘माझी वसुंधरा’ या अभियानाच्या माध्यमातून पर्यावरणाचे संरक्षण करण्याचा प्रयत्न शासन करते आहे. या अभियानाची सुरूवात 2 ऑक्टोबर रोजी प्रथम महाराष्ट्रात झाली. या अभियानांतर्गत भूमी, जल, वायू, आकाश अग्नि या पंचतत्वांना विकसित करणे, त्यांचे संरक्षण करण्यावरती भर देण्यात येतो. भविष्यात हा कार्यक्रम संपुर्ण देशभरात राबविला जाऊ शकतो. पनवेल महापालिका देखील या पंचतत्वातील प्रत्येक तत्वाचा विकास करण्यावरती भर देण्यात येत आहे. असे प्रतिपादन उपायुक्त कैलास गावडे यांनी केले.
‘माझी वसुंधरा’ अभियानांतर्गत दि.22 एप्रिल 28 एप्रिल दरम्यान ‘अर्थ आठवडा’ साजरा करण्यात येत आहे. पनवेल महानगरपालिका आणि पिल्लई आटर्स, वाणिज्य् आणि विज्ञान महाविद्यालय, युनीसेफ,नेहरू युवा संघटन, इन्फिनीटी फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानातून ‘अर्थ आठवड्यांतर्गत ऊर्जा संवर्धन आणि पर्यावरण संरक्षण या विषयाअंतर्गत ‘युथ क्लायमेट कॉन्क्लेव्ह कार्यक्रमाचे आयोजन आज पिल्लई कॉलेजमध्ये करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी युनीसेफचे राज्य् सल्लागार डॉ. तानाजी पाटील, पिल्लई कला,वाणिज्य् आणि विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य गजानन वडेर, उपप्राचार्य दिपिका शर्मा, डॉ. किरण देशमुख,पनवेल महानगरपालिकेच्या घनकचरा व आरोग्य विभाग प्रमुख अनिल कोकरे पर्यावरण विभाग प्रमुख मनोज चव्हाण, मुख्य आरोग्य निरीक्षक शैलेश गायकवाड उपस्थित होते.
यावेळी पिल्लई महाविद्यालयाच्या विद्यर्थ्यांनी तयार केलेल्या सेंसर बेस डस्टबीनचे माहिती देण्यात आली. तसेच विद्यार्थ्यांनी पर्यावरण संवर्धन आणि संरक्षणाची शपथ घेतली.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!