पनवेल दि.०२: केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण मंत्रालयाच्यावतीने आयोजित करण्यात येणाऱ्या ‘राष्ट्रीय युवा संसद महोत्सव- २०२१’ साठी जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगु काना ठाकूर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय (स्वायत्त), खांदा कॉलनी, नवीन पनवेल येथील राष्ट्रीय सेवा योजनेची स्वयंसेविका पौर्णिमा गायकवाड (द्वितीय वर्ष -कला शाखा) ची जिल्हास्तरीय स्पर्धेमधून निवड झाली आहे. या महोत्सवात सहभागी झालेल्या जिल्ह्यातील ६० विद्यार्थ्यांमधून तिची निवड झाली आहे. जिल्हास्तर युवा संसद मध्ये प्रत्येकाला आपले मत मांडण्यासाठी ४ मिनिटाचा वेळ दिला गेला. स्पर्धेसाठी सुचविलेल्या राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० या विषयावर उत्कृष्ट सादरीकरण करत असताना हे धोरण भारतीय शिक्षणाचे परिवर्तन करेल असे गायकवाड हिने सांगितले. त्यासाठी तिची जिल्हास्तरीय निवड होऊन तिने राज्यस्तरीय स्पर्धेत स्थान मिळवले.
तिच्या या यशाबद्दल महाविद्यालयाच्या प्राचार्यानी प्रशस्तीपत्र देऊन कौतुक केले. सदर स्पर्धेसाठी राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे मुख्य कार्यक्रम अधिकारी प्रा. सूर्यकांत परकाळे, कार्यक्रम अधिकारी प्रा. गणेश साठे, प्रा. सत्यजित कांबळे, प्रा. सागर खैरनार व महिला कार्यक्रम अधिकारी डॉ. योजना मुनीव यांनी विशेष परिश्रम घेतले.
सदर विद्यार्थिनीस महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. वसंत बऱ्हाटे, उपप्राचार्य डॉ. एस. के. पाटील, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष समन्वयक डॉ. बी डी. आघाव, भूगोल विभागप्रमुख डॉ. दिपक नारखेडे, परीक्षा नियंत्रक डॉ. सुभाष उन्हाळे यांनी पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!