खमंग मेजवानी – पोपटी कवी संमेलन २०१९
जागतिक स्पर्धेत टिकण्यासाठी सर्वांच इंग्रजी माध्यमात मुलांना प्रवेश घेण्याकडे सर्वांचा कल वाढला आहे. मात्र आपली संस्कृती टिकेल की नाही अशी परिस्थिती निर्मांण झाली आहे. अशावेळी बोलीभाषेत होणारी पोपटी कवी संमेलन बोलीभाषा जिवंत राहण्यास उपयुक्त ठरतील असे प्रतिपादन महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी केले. कोकण मराठी साहित्य परिषदेच्या नवीन पनवेल शाखेने आयोजित केलेल्या पोपटी कवी संमेलनात केले. यावेळी सुप्रसिध्द कवी अशोक बागवे, ग्रामिण ढंगात कविता सादर करणारे साहेबराव ठाणगे, अभिनेते संतोष पवार, भारत सावळे, कोपसापचे जिल्हाअध्यक्ष सुधाकर चव्हाण, कवी एल. बी. पाटील, गणेश कोळी आदी उपस्थित होते. पोपटी कवी संमेलनाच्या उदघाटन कार्यक्रमाला उपस्थित लावलेल्या आयुक्त गणेश देशमुख यांना कविंच्या कविता ऐकल्यानंतर त्यांच्या आठवणीतील कविता सादर करण्याचा मोह आवरला नाही. मराठी भाषा टिकविण्यासाठी प्रत्येक बोलीभाषेतील अशाप्रकारची कवी संमेलने व्हायला हवीत असे त्यांनी आपल्या भाषणात व्यक्त केले. वालांच्या शेंगा, वांगी, बटाटे, लसूण अशा भाज्यांपासून बनविण्यात येणाऱ्या पोपटीला अग्नी देवून कवीता सादरीकरणाला सुरूवात झाली. स्थानिक आगरी भाषेतील कवितांचा प्रभाव असलेल्या पोपटी कवी संमेलनात उपस्थित कवींनी एकापेक्षा एक कविता सादर केल्या. एकीकडे पोपटीची धग वाढतात कवींच्या कवितांनी कार्यक्रमाची रंगत वाढवली. प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले सुप्रसिध्द कवी प्रा. अशोक बागवे यांनी आपल्या भाषणात आगळ्या वेगळ्या रायगडच्या संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या पोपटी कवी संमेलनात कौतुक केले. पनवेल परिसरात होणारी ही पोपटी कवीसंमेलने राज्यपातळीवर आयोजित करून संस्कृती टिकविण्यासाठी, नवोदित कवींना व्यासपिठ देण्यासाठी मोठ्या प्रमाणात आयोजित केली जावीत असे मत त्यांनी व्यक्त केले. प्रसिध्द लेखक, दिग्दर्शक अभिनेते संतोष पवार यांनी देखील पोपटी कवींचे कौतुक केले. कविता हे प्रचंड ताकदीचे माध्यम आहे. पोपटी कवी संमेलनाबद्दल मी अनेकवेळा ऐकले होते. परंतु पहिल्यांचा याचा आस्वाद घेता आला. या आगळ्या वेगळ्या कवी संमेलनामुळे कवीता ऐकून मन तृप्त झाले. परंतु स्थानिक बाज असलेले पदार्थ खावून पोट देखील तृप्त झालो आहे अशा मार्मिक शब्दांत त्यांनी आपले मत व्यक्त केले.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!