पनवेल दि.22: मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शेकाप नेते राजेंद्र पाटील यांच्यावर विमानतळ नामकरण आंदोलानाच्या पार्श्वभूमीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांची परवानगी न घेता बैठक बोलवून गर्दी जमविल्याप्रकरणी एनआरआय पोलिस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नामकरण आंदोलनासाठी मागील दोन महिन्यांपासून अनेक बैठका होत आहे, आमदार खासदारांच्या उपस्थितीत अनेक बैठका पार पडल्या जात असताना राजेंद्र पाटील यांच्यावर करण्यात आलेली कारवाई चर्चेचा विषय ठरला आहे. विशेष म्हणजे शेतकरी कामगार पक्षाच्या भूमिकेसोबत न जाता राजेंद्र पाटील पक्षाच्या विरोधात भूमिका घेवून दिबांच्या नावावर ठाम आहेत. महाविकास आघाडीत असलेल्या पक्षांनी दिबांच्या नावाला पाठिंबा काढून घेतल्यानंतर दिबांच्या समर्थकांची कोंडी झाली. अनेकांनी पक्षाच्या विरोधात भूमिका घेतली. शेतकरी कामगार पक्षामध्ये यावरून दोन गट पडले आहेत.

ब्रेक द चैन अंतर्गंत सध्या लॉकडाऊनच्या नियमांमध्ये शिथिलता आणण्यात आली असली तर जमावबंदी लागू आहे. मात्र पनवेलमध्ये सुरू असलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरणाला प्रकल्पग्रस्तांचे नेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी स्थानिकांचे आंदोलन सुरू आहे. मानवी साखळी यशस्वी केल्यानंतर 24 तारखेला सिडकोच्या विरोधात सिडको भवन घेराव आंदोलन करण्याची घोषणा केली आहे. शेतकरी कामगार पक्षाने महाविकास आघाडीच्या सुरात सुर मिळवून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाला पाठिंबा दिला आहे. मात्र शेतकरी कामगार पक्षाचे नेते मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राजेंद्र पाटील यांनी मात्र दिबांच्या नावावर राहून ठाम भूमिका घेतली आहे. उलवे परिसरात राजकीय ताकद असलेल्या पाटील यांनी रविवारी उलवे सेक्टर 23 मधील जिल्हा परिषद शाळेत शेकाप कार्यकर्त्यांची बैठक बोलावून आंदोलनात सहभागी होण्यासाठी आवाहन केले होते. एनआरआय पोलिस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या या बैठकीनंतर पोलिसांनी कारवाईचा बडगा उचलला आहे. 188 कलमाप्रमाणे राजेंद्र पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात आली आहे.

‘दिबांच्या नावासाठी माझ्यावर गुन्हा दाखल झाला ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे, एक नव्हे तर असे अनेक गुन्हे दाखल झाले तरी आम्ही या भूमिकेवरून माघार घेणार नाही.’
असे राजेंद्र पाटील यांनी त्यांच्यावर दाखल झालेल्या गुन्हा नोंदी प्रकरणी बोलताना सांगितले.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!