उरण दि १८ (विठ्ठल ममताबादे) उरण येथील कोकण मराठी साहित्य परिषद व मधुबन कट्टा यांच्या संयुक्त विद्यमाने प्रत्येक महिन्यात १७ तारखेला कवी संमेलन भरविले जाते. या ऑगस्ट महिन्याच्या १७ तारखेलाही मुक्त वातावरणात ऍडव्होकेट डी के पाटील यांच्या निवास स्थानी उरण येथे ” सुनाई कविसम्मेलन ” या रूपात मधुबन कट्टा जेष्ठ पत्रकार गणेश कोळी यांच्या अध्यक्षतेखाली जोशात बहरला. यावेळी रायगडभूषण जेष्ठ साहित्यिक प्रा.एल.बी.पाटील, उरणचे माजी नगराध्यक्ष नगराजशेठ,कीर्तनकार एकनाथ पाटील, साहित्यिक अमृत पाटील आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. कवयित्री सुनंदा के.पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त उरण मधील प्रसिद्ध वकील डि.के.पाटील यांनी कवी संम्मेलनाचे आयोजन केले होते. सूत्रसंचालन रंजना जोशी केणी यांनी केले तर प्रास्ताविक प्रदीप पाटील यांनी केले. कवयित्रीच्या पुण्यतिथीनिमित्त कविसम्मेलन घेऊन ऍडव्होकेट डी. के. यांनी संस्कारी पायंडा घातला आहे. असा विचार आपल्या अध्यक्षीय भाषणात पत्रकार गणेश कोळी मांडला. कविसम्मेलनात अमृत पाटील,मच्छिंद्र म्हात्रे,रायगडभूषण किशोर पाटील, रंजना केणी, भ.पो.म्हात्रे,संजीव पाटील, अजय शिबकर ,संजय होळकर, चेतन भोईर,एकनाथ म्हात्रे,संपदा पाटील, प्रा.अशोक खातू, मनोज उपाध्ये,संजय ठाकुर, अनंता पाटील ,शिवप्रसाद पंडित आदी २१ कवींनी आई,निसर्ग, प्रेम,भक्ती,राजकारण, शेती इत्यादी विषयांवर कविता सादर केल्या.आभार प्रदर्शन मच्छिंद्र घरत यांनी केले.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!