पनवेल दि.७: पनवेल महानगरपालिकेच्या महापौर पदासाठी भाजप मित्रपक्ष युतीच्या उमेदवार डॉ. कविता चौतमोल तर उपमहापौर पदासाठी जगदिश गायकवाड यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, शहराध्यक्ष जयंत पगडे, सभागृहनेते परेश ठाकूर, माजी उपनगराध्यक्ष संदीप पाटील, स्थायी समिती सभापती प्रविण पाटील यांच्यासह नगरसेवक, नगरसेविका उपस्थित होते.
पनवेल महापालिकेची स्थापना १ ऑक्टोबर २०१६ रोजी झाली. पनवेलच्या पहिल्याच निवडणुकीत माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली ७८ नगरसेवकांपैकी ५१ नगरसेवक जिंकून पनवेल महापालिकेवर विजयाचा झेंडा रोवला. १० जानेवारी रोजी ही निवडणूक होणार असून निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी निवडणुकीचे काम पाहणार आहेत. या महापालिकेत ७८ पैकी ५१ नगरसेवक भाजप मित्रपक्ष युतीचे आहेत. शेकापनेही या पदांसाठी आपला उमेदवार दिला आहे. पक्षीय बळाबल पाहता भाजप युतीचे पारडे अधिक जड आहे, त्यामुळे १० जानेवारीला पुन्हा एकदा डॉ. कविता चौतमोल महापौर म्हणून तर जगदिश गायकवाड उपमहापौरपदावर विराजमान होणार आहेत, त्यामुळे फक्त औपचारिकता बाकी आहे.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!