पनवेल दि.३: मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड भागात मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. खारघर येथील पांडवकडा धबधब्यात चार तरुणी वाहून गेल्या असून दोघींचा मृतदेह हाती लागला आहे. दोघींचा शोध अद्याप सुरु आहे. घटनास्थळी पोलिस आणि अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले असून शोधकार्य सुरु आहे. या नेरुळ येथील एसआयईएस कॉलेजच्या विद्यार्थीनी आहेत. सातत्याने कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे आणि समुद्राला आलेल्या भरतीमुळे कुर्ला, सायन, चुनाभट्टी या भागात पाणी शिरले. त्यामुळे हार्बर मार्गावरील सीएसएमटी ते वाशी दरम्यानची लोकलसेवा तात्पुरती बंद ठेवण्यात आली. तसंच मध्य रेल्वेची सीएसएमटी ते ठाणे वाहतूकही ठप्प झाली. ठाणे येथील घोडबंदर रोडवरील वसंत लीला संकुलातील संरक्षक भिंत कोसळली असून त्यात एका कारचे नुकसान झाले आहे. येत्या 24 तासांत मुंबईत अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. तसंच काल रात्री पासून होणाऱ्या दमदार पर्जन्यवृष्टीमुळे मुंबईतील शाळांना देखील आज सुट्टी जाहीर करण्यात आली. रात्रीपासूनच मुंबईसह उपनगरांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली. ठाणे, डोंबिवली, कल्याण, अंबरनाथ, बदलापूर या भागात पावसाच्या दमदार सरी कोसळत आहेत. त्याचबरोबर अंधेरी, विक्रोळी, घाटकोपर, कांजूरमार्ग या भागातही चांगलाच पाऊस होत होता. विरार वसईमध्ये देखील पावसाचा जोर वाढल्याने सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली. तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागात होत असलेल्या दमदार पर्जन्यवृष्टीमुळे पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून किनारपट्टीच्या भागात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. याशिवाय पुणे, नाशिक, कोल्हापूर या भागातही वरुणराजा चांगलाच बरसला. येत्या 24 तासांत मुंबईसह ठाणे, नवी मुंबई या भागात अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने वर्तवला आहे.

[dimage url=”https://khabarbaat360.com/wp-content/uploads/2019/11/1-1.jpg” zoom_level=”1″ anim_speed=”1″ control=true] –

[dimage url=”https://khabarbaat360.com/wp-content/uploads/2019/11/2-1.jpg” zoom_level=”1″ anim_speed=”1″ control=true] –

[dimage url=”https://khabarbaat360.com/wp-content/uploads/2019/11/3-1.jpg” zoom_level=”1″ anim_speed=”1″ control=true] –

[dimage url=”https://khabarbaat360.com/wp-content/uploads/2019/11/4-1.jpg” zoom_level=”1″ anim_speed=”1″ control=true] –

[dimage url=”https://khabarbaat360.com/wp-content/uploads/2019/11/5-1.jpg” zoom_level=”1″ anim_speed=”1″ control=true] –

[dimage url=”https://khabarbaat360.com/wp-content/uploads/2019/11/6-1.jpg” zoom_level=”1″ anim_speed=”1″ control=true] –

[dimage url=”https://khabarbaat360.com/wp-content/uploads/2019/11/7-1.jpg” zoom_level=”1″ anim_speed=”1″ control=true] –

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!