परशुराम घाट वाहतूकीसाठीच्या बंद कालावधीत समन्वयासाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती
अलिबाग,दि. 21: जिल्हाधिकारी रत्नागिरी यांनी दि.25 एप्रिल 2023 ते दि.10 मे 2023 या कालावधीमध्ये दुपारी 12 ते सायंकाळी 5 पर्यंत परशुराम घाट सर्व प्रकारच्या वाहतूकीसाठी बंद ठेवण्याबाबत आदेशित केले आहे. या बंद कालावधीत कार्यकारी अभियंता, राष्ट्रीय महामार्ग विभाग, पेण कार्यालयाच्या वतीने सर्व स्थानिक यंत्रणासोबत समन्वय साधण्याकरिता व वाहतूक सुरळीत ठेवण्याच्या दृष्टीने समन्वय अधिकारी म्हणून सहाय्यक अभियंता, श्रेणी-1 श्री.पंकज गोसावी, मो.9561848502 व शाखा अभियंता अमोल माडकर, मो.7038832535 यांची नेमणूक करण्यात आली आहे.
घाट बंद कालावधीत कंत्राटदाराकडून अपेक्षित असलेल्या सर्व बाबींची प्रत्यक्षात अंमलबजावणी करणे, बंद कालावधीत कंत्राटदाराकडून सर्व सुरक्षा उपाययोजना राबविणे कामाची योग्य गती राखणे याबाबत कंत्राटदारास सूचित करणे व दैनंदिन अहवाल सादर करण्याची जबाबदारी संबंधित अधिकाऱ्यांची असेल.
या व्यतिरिक्त आपत्कालीन परिस्थिती हाताळण्याच्या दृष्टीने अधिकाऱ्यांशी समन्वय साधून वेळोवेळी गस्त घालणे व वाहतूक सुरळीत ठेवण्याच्या दृष्टीने कामकाज पाहण्याकरिता सहाय्यक कार्यकारी अभियंता, आकांक्षा मेश्राम, मो.788813354, शाखा अभियंता, रविंद्र भोये, मो.9405366808, शाखा अभियंता, राहुल विशे, मो.8007257980, कनिष्ठ अभियंता, अभिजित झेंडे, मो.8262040257 या अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे, असे कार्यकारी अभियंता, राष्ट्रीय महामार्ग विभाग, पेण यांनी कळविले आहे.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!